Latest update on pune ATM robbery in Thieves loot 20 lakh 30 thousand cash  saam tv
क्राईम

Pune Crime : पुण्यात एटीएम फोडून २० लाख ३० हजारांची रोकड लंपास; सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर कलर स्प्रे मारून चोरट्याचा डल्ला

PUNE ATM ROBBERY : पुण्यातील पिंपरी- चिंचवड शहरात चक्क चोरट्यांनी कॅमेऱ्यावर कलर स्प्रे मारुन एटीएम लुटल्याचा धक्कादाठक प्रकार समोर आला आहे. यामुळे शहरातील या प्रकारामुळे एटीएम मशीनच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Saam Tv

पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे गुरव परिसरात एटीएम मशीन फोडून तब्बल २० लाख ३० हजार ८०० रुपयांची रोकड चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्याने एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर कलर स्प्रे मारून त्यानंतर गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन फोडले. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पिंपळे गुरव येथील श्वेतायान कॉलनी परिसरात असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या एटीएममध्ये १७ सप्टेंबर रोजी पहाटे ही चोरी झाली. चोरट्याने सर्वप्रथम एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर रंगाचा स्प्रे मारून त्याचे चित्रीकरण बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन फोडून त्यातील रोकड काढली. अवघ्या काही मिनिटांत चोरट्याने तब्बल २० लाख ३० हजार ८०० रुपयांची रोकड घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीसाठी वापरण्यात आलेली पद्धत आणि चोरट्याने केलेले नियोजन पाहता पोलिसांकडून या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू आहे.

दरम्यान, एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर कलर स्प्रे मारून गॅस कटरच्या साहाय्याने लाखो रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या या चोरट्याचा शोध सांगवी पोलीस घेत आहेत. परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा तपास करण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train: आधी इडली अन् मेदुवडा, आता खा पुरणपोळी, 'वंदे भारत'च्या प्रवासादरम्यान मराठमोळ्या चवीची मेजवानी

डायनिंग टेबलच्या समोर आरसा लावावा की नाही? जाणून घ्या वास्तुशास्त्रातील शुभ-अशुभ संकेत!

Maharashtra News Live Update: एक कोटींचे कर्ज दिले, तीन कोटींची मागणी! व्याजाच्या वसुलीसाठी जीवे मारण्याची धमकी

सांगली जिल्हा बँकेवर काँग्रेसचा अध्यक्ष, तर उपाध्यक्षपदी शिंदेंसेनेचे पाटील

शिवसेना सत्तासंघर्ष अंतिम टप्प्यात! बाळासाहेब पाटील प्रकरणाचा दाखला, सर्वोच्च न्यायालयात आज काय घडलं? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT