Pune Crime News Saam TV
क्राईम

Pune Crime News: पोलीस स्टेशनमध्ये हेराफेरी! पोलिसांनी लढवलेली चोरीची शल्लक पाहून सारेच चक्रावले

Crime News: आरोपीने लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या कर्माचाऱ्यांनीच काही दुचाकी परस्पर विकायला सांगितले अशी कबुली दिली. सदर गाड्या स्क्रॅपच्या असल्याचे सांगत पोलीसांनी या आरोपीला त्या बाजारात विकण्यास सांगितले.

Ruchika Jadhav

अक्षय बडवे

Pune:

पुण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शहर पोलीस दलातील ४ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आलेय. पोलीस कर्मचाऱ्यांनीच पोलीस ठाण्यात चोरीचा माल परस्पर लंपास केल्याने ही कारवाई केल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. या आरोपीची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. आरोपीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या कर्माचाऱ्यांनीच काही दुचाकी परस्पर विकायला सांगितले अशी कबुली दिली.

सदर गाड्या स्क्रॅपच्या असल्याचे सांगत पोलीसांनी या आरोपीला त्या बाजारात विकण्यास सांगितले. स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी आणि लाभासाठी या पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीला हे कृत्य करण्यास भाग पाडले. सदर प्रकरणी चौकशीसाठी वेळोवेळी पोलीस कर्मचाऱ्यांना बोलावले होते. मात्र ते उपस्थित राहिले नाही, परिणामी कर्तव्यात कसूरी केल्याप्रकरणी या कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

काल (सोमवारी) या ४ पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची ऑर्डर पोलीस उपायुक्तांनी जाहीर केलीय. लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील इतर कर्मचाऱ्यांनी या प्रकरणी संताप व्यक्त केलाय. दयानंद गायकवाड, संतोष आंदुरे, तुकाराम पांढरे, राजेश दराडे अशी निलंबीत पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

चॉकलेटचं आमिष दाखवत 3 वर्षांच्या चिमुकलीला सोबत नेलं, २० मिनिटांनी घरी आणून सोडलं... नराधमाचं संतापजनक कृत्य

जेवताना तोंडी लावण्यासाठी बनवा वांग्याचे कुरकुरीत काप; सोपी आणि चवदार रेसिपी!

SCROLL FOR NEXT