Pune Crime News Saam TV
क्राईम

Pune Crime News: पोलीस चौकीसमोर तरुणानं स्वत:ला पेटवून घेतलं; धक्कादायक कारण आलं समोर

Set Himself On Fire: पोलीसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. मात्र त्यांच्यावर कारवाई केली नाही. कारवाईला होत असलेला उशिर पाहून रोहिदास आणखी संतापला आणि हताश झाला.

Ruchika Jadhav

सचिन जाधव

Pune News:

पुण्यातून एक थरारक घटना समोर आली आहे. एका तरुणाने पोलीस चौकी समोरच स्वत:ला पेटवून घेतलंय. या विचित्र घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रोहिदास अशोक जाधव ( वय २८, रा. सिद्धी अपार्टमेंट, डोमखेल रोड, वाघोली ) असे पेटवून घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. तरुण राहत असलेल्या ठिकाणी तेथील अन्य व्यक्तींकडून त्याला मानसिक त्रास दिला जात होता. त्या व्यक्तींशी गेल्या अनेक दिवसांपासून त्याचे वाद सुरू होते. अशात त्याच व्यक्तींकडून काही दिवसांपूर्वी त्याला मारहाण झाली.

झालेल्या प्रकाराची तक्रार करण्यासाठी तो पोलीस ठाण्यात गेला. रोहिदासने संबंधित व्यक्तींविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यावर पोलीसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. मात्र त्यांच्यावर कारवाई केली नाही. कारवाईला होत असलेला उशिर पाहून रोहिदास आणखी संतापला आणि हताश झाला.

यातच मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास वाघोली पोलीस चौकी समोर त्याने स्वतःला पेटून घेतलं. यामध्ये तो ९० टक्के भाजला आहे. त्याला वाघोली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून पुणे येथील रुग्णालयात हलविण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

भाषा बदलली, गाड्या बदलल्या पण गोधडी नाही! आझाद मैदानाच्या मागे झाल्या सेटिंग, मनोज जरांगेंवर कोणी केला गंभीर आरोप?

रात्री ११ वाजता इन्स्टाग्रामवर आला एक 'व्हिडिओ कॉल' अन् मुंबईतील व्यावसायिकाच्या आयुष्यात वादळ; नक्की काय घडलं?

Maharashtra News Live Update: उजनी धरणावरील खासगी मासेमारी ठेका रद्द, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाठपुराव्याला यश

Curd vs Buttermilk : दही की ताक; रोजच्या आहारात अधिक फायदेशीर काय?

SCROLL FOR NEXT