Daund Crime News Saam Tv
क्राईम

Pune Crime: नाव बिबट्याचं पण काम पुतण्याचं, दौंडमधील महिलेच्या हत्येचं गूढ अखेर उकललं

Daund Crime News: दौंडमध्ये काही दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा तपास करताना धक्कादायक माहिती उघड झाली. पुतण्यानेच महिलेची हत्या केली असल्याची माहिती समोर आली.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

दौंड तालुक्यातील कडेठाण येथील लता धावडे या महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला नाही, तर पुतण्यानेच दगडाने ठेचून हत्या केली असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी यवत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सतिलाल वाल्मीक मोरे (३० वर्षे) आणि अनिल पोपट धावडे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. सतिलाल मोरे हा मूळचा धुळ्याचा असून तो दौंडच्या कडेठाण येथे राहत होता.

यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील वरवंड आणि कडेठाण गावच्या शिवेवर असलेल्या कडेठाण हद्दीत ७ डिसेंबर २०२४ रोजी शेतात काम करणाऱ्या लताबाई बबन धावडे (५० वर्षे) यांच्यावर बिबट्याने हल्ला करून त्यांना उसाच्या शेतात फरपटत नेले असल्याचे सांगण्यात आले होते. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता असा दावा याप्रकरणातील फिर्यादी आणि आताचा आरोपी अनिल धावडे याने केला होता. पोलिस आणि वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच त्यांचा मृतदेह घटनास्थळावरून हलवण्यात आला होता.

वन विभागाने हा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला नसल्याची शंका उपस्थित केली होती. मृत महिलेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन वन विभागाच्या नागपूर येथील प्रादेशिक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. मृत महिलेवर कोणत्याही वन्य प्राण्याने हल्ला करून मृत्यू झाला नसल्याबाबतचा अहवाल प्रादेशिक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा नागपूर येथून पोलिसांना प्राप्त झाला. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.

आरोपींनी अनैतिक संबंधाचे कारणावरून आपसात संगनमत करून लता धावडे यांची हत्या करण्याचा कट रचून त्यांचे तोंड आणि डोके दगडाने ठेचून हत्या केली असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. हत्या झालेली महिला गवत खुरपण्यासाठी शेतात गेली असता दोन्ही आरोपींनी त्याठिकाणी गेले. यामधील सतिलाल मोरेने त्यांना बाजूला बोलावून घेतलं.

आपल्या पुतण्याचा घरी काम करणारा व्यक्ती असल्यामुळे लता धावडे त्याच्यासोबत गेल्या. उसाच्या दोन शेतामध्ये असणाऱ्या बांधावर आरोपी लता धावडे यांना घेऊन गेला. त्या ठिकाणी त्यांना तोंड दाबून बेशुद्ध केलं आणि त्यानंतर मग मुख्य आरोपी त्याठिकाणी आला आणि या दोघांनी मिळून त्या ठिकाणी त्यांची दगडाने ठेचून हत्या केली. याबाबत पाटस पोलिस तपास करत होते. तपासात लता यांच्यावर बिबट्याने हल्ला केले नसल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी कसून तपास करत सतिलाल वाल्मीक मोरे, अनिल पोपट धावडे यांना अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

Maharashtra Live News Update: सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खांबटकी घाटात ट्रकला मोठी आग

Maharashtra Politics : ‘म’ म्हणजे मराठी नव्हे, तर ‘म’ म्हणजे महापालिका! चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर घणाघात

Blue Colour Saree: श्रावणात सणासुदींना नेसा 'या' सुंदर निळ्या रंगाच्या साडी, सगळ्यांच्या नजरा राहतील तुमच्यावरुन खिळून

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र येताच नितेश राणेंचा टोला, नवरा कोण आणि नवरी कोण?|VIDEO

SCROLL FOR NEXT