Pune Love affair Crime Saam TV
क्राईम

Pune Crime News: प्रेयसीला भेटायला हॉटेलात गेला अन् घात झाला; पुण्यातील तरुणासोबत घडलं भयंकर

Pune Latest News: प्रेयसीला भेटायला गेलेल्या एका तरुणाची आसाममधील गुवाहाटी शहरात हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत दोघांना अटक केली आहे.

Satish Daud

Pune Latest Crime News

मागील काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. प्रेमप्रकरण तसेच अनैतिक संबधातून खूनासारख्या भयानक घटना घडत आहेत. अशीच एक घटना पुण्यातून समोर आली आहे. प्रेयसीला भेटायला गेलेल्या एका तरुणाची आसाममधील गुवाहाटी शहरात हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत दोघांना अटक केली आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

संदीप सुरेश कांबळे (वय ४४, रा. येरवडा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. संदीप याचा मृतदेह गुवाहाटी शहरातील तारांकित हॉटेलमध्ये सोमवारी (५ फेब्रुवारी) आढळून आला होता. याप्रकरणाचा तपास करताना गुवाहाटी पोलिसांनी तरुणीसह दोघांना अटक केली आहे. (Latest Marathi News)

अंजली शॉ, विकासकुमार शॉ, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत संदीप याची आरोपी अंजलीसोबत कोलकात्ता येथील विमानतळावर भेट झाली होती. कालांतराने त्यांच्या प्रेमसंबंध निर्माण झाले. संदीपला भेटण्यासाठी आरोपी अंजली नेहमी पुण्यात येत होती.

मृत संदीप देखील तिला भेटण्यासाठी गुवाहाटी येथे जात होता. यादरम्यान, संदीपने अंजलीला लग्नाची मागणी घातली. मात्र, संदीप विवाहित असल्याने अंजलीने लग्नाला नकार दिला. त्यामुळे संदीपने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. याचा राग मनात धरून अंजलीने संदीपचा काटा काढण्याचा प्लान आखला.

तिने मित्राची मदत घेऊन संदीपला भेटण्यासाठी गुवाहाटी येथे बोलावले. तिथे एका हॉटेलात नेऊन संदीपला मिठाईतून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर विकासच्या मदतीने त्याची हत्या केली. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. दरम्यान, हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अनधिकृत बॅनर्सवर ठाण्यात बुलडोझर! 8 दिवसांत 1524 अनधिकृत होर्डिंग्ज हटवले

राहुल गांधींच्या नाकातून निघालं रक्त; पोलिसांनी उचलताना नाकाला दुखापत झाल्याचा आरोप

Maharashtra News Live Update: परभणीत मध्यरात्री धक्कादायक घटना; आलिशान कारमधून येत मोकाट गायीची चोरी

Hair Care: पावसाळ्यात फ्रिझी केसांपासून मिळवा सुटका; फॉलो करा या ५ सोप्या हेअर केअर टिप्स

हातात बेड्या अन् प्रचंड राग...पंतप्रधानांच्या घराबाहेर राहुल गांधींनी केलेल्या आंदोलनाची दृश्ये, पाहा PHOTO

SCROLL FOR NEXT