Pimpri Chinchwad Crime News Saam Tv
क्राईम

Pimpri Chinchwad: नवजात बाळांच्या खरेदी-विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, सहा महिलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Pimpri Chinchwad Crime News: पुण्यातील एका सुप्रसिद्ध रुग्णालयामधील एका नर्सच्या मदतीने पुणे शहरातील काही महिला नवजात बाळांची खरेदी विक्री व्यवहार करत असल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Pimpri Chinchwad Crime News:

>> गोपाळ मोटघरे

पुण्यातील एका सुप्रसिद्ध रुग्णालयामधील एका नर्सच्या मदतीने पुणे शहरातील काही महिला नवजात बाळांची खरेदी विक्री व्यवहार करत असल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलं आहे. नर्स आणि बाळाचे खरेदी विक्री व्यवहार करणाऱ्या महिलांनी मिळून आतापर्यंत पुणे शहरात सहा नवजात बाळांची विक्री गरजू दाम्पत्यांना केली, असं पोलीस तपासात समोर आलं आहे.

या टोळतील महिलांनी पुणे शहराबाहेर आणखी कुठे बाळांची खरेदी - विक्रीचे व्यवहार केले आहेत का ? याचा शोध सध्या वाकड पोलीस घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या दांपत्याला वंध्यत्वाची समस्या आहे. अशा दांपत्याची माहिती रुग्णालयामध्ये काम करणारी नर्स या टोळतील महिलांना देत होती. त्यानंतर टोळीतील महिला वंध्यत्व समस्या भेडसावत असलेल्या दांपत्यांना मिळून त्यांना पाच ते सात लाखात नवजात बाळ विकत देण्याचा प्रलोभन देत असायच्या.

त्यासाठी या टोळतील महिला आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेले दांपत्य शोधायचे. ज्या दांपत्याकडे दोन पेक्षा जास्त मुले आहेत आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. अशा दांपत्याला पैशाचं आमिष दाखवून या टोळीतील महिला गरजवंत दांपत्याला नवजात बाळ विकत होते.

या प्रकरणात सध्या वाकड पोलिसांनी सहा महिलांना ताब्यात घेतलं असून त्यांच्या विरोधात वाकड पोलीस स्टेशनमध्ये भादवी 370 (3)(4) नुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच ज्या दांपत्यांनी या टोळीतील महिलांकडून नवजात बालकांची बेकायदेशीर खरेदी केली अशा दांपत्यावरही पोलीस कठोर कारवाई करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी काँग्रेसला पोलिसांनी दिली परवानगी

Healthy Lifestyle : तुमच्या वयानुसार शरीराला किती प्रोटीनची गरज आहे? जाणून घ्या योग्य प्रमाण

Curly Hair Care Tips : रोज स्ट्रेटनर वापरून कंटाळलात? करा हे सोपे उपाय; कुरळे केस होतील स्ट्रेट

Spain Migrants: स्पेनमध्ये समुद्रमार्गे हजारो नागरिकांची घुसघोरी, परिस्थिती चिघळली; १८ जणांचा मृत्यू, थरारक VIDEO

Gold Price Today : सलग दुसऱ्या सोन्याने घतली उसळी, प्रति तोळा इतक्या रुपयांवर दर पोहोचला; वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे दर

SCROLL FOR NEXT