nagpur police arrests youth along with md powder worth rs 8 lakh  saam tv
क्राईम

Nagpur Crime News : नागपुर तहसील पोलिसांची मोठी कारवाई, 8 लाखाच्या एमडी पावडरसह युवकास अटक

Nagpur Latest Crime News : नागपूर शहरात लोकसभा निवडणुक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पाेलिसांनी मोठ्या प्रमाणात गस्त वाढविली आहे.

Siddharth Latkar

- पराग ढाेबळे

Nagpur :

नागपूर शहरातील तहसील पोलिसांनी एमडी पावडरची विक्री करणाऱ्यास अटक केली. त्याच्याकडून सुमारे 8 लाख 11 हजार रुपयांची एमडी पावडर जप्त करण्यात आली आहे. विमलकुमार सिद्ध प्रसाद असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नागपूर शहरात लोकसभा निवडणुक (lok sabha) आचारसंहितेच्या (code of conduct) पार्श्वभूमीवर पाेलिसांनी मोठ्या प्रमाणात गस्त वाढविली आहे. तहसील पोलिस ठाण्यातील पथक गस्तीवर असताना भानखेडा येथील रेल्वे लाईननजीक पुलाजवळ दुचाकीवर एक जण एमडी पावडरची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पाेलिस घटनास्थळी पाेहचले असता त्यांना एमडी पावडरची विक्री करताना एक जण सापडला. त्याला पाेलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या खिशातून 72 ग्रॅम एमडी पावडरसह दुचाकी साहित्या मोबाईल असा 8 लाख 11 रुपयेचा मुद्देमाल जप्त केला आला. (Maharashtra News)

विमलकुमार सिद्ध प्रसाद असे अटक केलेल्याचे नाव असून पावडर शेख दानिश याच्याकडून त्याने आणल्याचे सांगितले. पोलिसांनी दाेघांवर गुन्हा दाखल केला असून शेख याचा शोध सुरू असल्याची माहिती संदीप बुवा (पीआय तहसील पोलीस स्टेशन नागपूर) यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मराठीची रचना जैनांनी केली, मुंबईत जैन विद्यापीठ हवे - जैन मुनी

Maharashtra Live News Update: सुषमा अंधारेंचे आरोप धादांत खोटे; तक्रार असल्यास मुख्यमंत्र्यांकडे पुरावे द्यावेत - दीपक साळुंखे

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

SCROLL FOR NEXT