police arrests two youth at kamani haud satara saam tv
क्राईम

Satara : पालकमंत्र्यांचे 'ते' वक्तव्य पाेलिसांनी घेतले गांभीर्याने, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गाेळीबार करणा-या युवकांची काढली वरात

पाेलिसांनी तपासाची अंती दोन युवकांवर गुन्हा दाखल केला होता.

ओंकार कदम

Satara News :

सातारा शहरातील कमानी हौद चौक परिसरात गोळीबार करणाऱ्या संशयित आरोपींची पोलिसांनी धिंड काढली. दहशत मोडत काढण्यासाठी संशयित आरोपींची पाेलिसांनी शहरातून धिंड काढली. या प्रकारानंतर चाैका-चाैकात पाेलिसांच्या कृतीची जाेरदार चर्चा रंगली हाेती. (Maharashtra News)

सातारा शहरातील कमानी हौद परिसरात बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास गाडी लावण्याच्या कारणावरून विशाल वायदंडे या युवकावर दोघांनी गोळीबार केला होता. पाेलिसांनी तपासाची अंती दाेन युवकांवर गुन्हा दाखल केला हाेता.

गुन्हा दाखल असलेल्या दाेन्ही युवकांना पाेलिसांनी साेमवारी (ता.1) अटक केली. त्यानंतर संशयित आरोपी धीरज ढाणे आणि हर्षद शेख या दाेन्ही युवकांना साेबत घेत पाेलिसांनी त्यांना घटनास्थळावरुन पायी चालत नेले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सातारा शहरातील गुन्हेगारांची दहशत मोडून काढण्यासाठी संपूर्ण शहरातून या दोन्ही संशयित आरोपींची धिंड काढल्याची जाेरदार चर्चा चाैकाचाैकात रंगली.

अपप्रवृत्ती मोडीत काढू : देसाई

साता-याच्या प्रगतीत काेणी अडथळा आणत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. या प्रवृत्ती मोडीत काढल्या जातील अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाईंनी काही दिवसांपूर्वीच उद्याेजकांना दिली हाेती. त्यानंतर साता-यातील गुन्हेगारी माेडीत काढण्यासाठी पाेलिसांनी प्रयत्न सुरु केले आहेत अशी देखील चर्चा रंगली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : धाराशिवमधील चारा जिल्ह्याबाहेर नेण्यास बंदी

Heart blockage symptoms: ही 5 लक्षणं दिसली तर समजा की हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्यात; हार्ट अटॅक येण्यापूर्वी लक्ष द्या

Mumbai Tourism : किल्ल्यासारखं दिसणारं गणपतीचं मंदिर, मुंबईजवळच आहे 'हे' खास लोकेशन

EPFO New Rule 2026 : मोठी बातमी! ₹25,000 EPFO मर्यादा लागू; तुमचा पगार कमी होणार?

Cardamom Benefits: पचनक्रिया सुधारण्यापासून तोंडाची दुर्गंधी कमी करण्यापर्यंत; रोज १ वेलची खाण्याचे ७ फायदे

SCROLL FOR NEXT