Pimpari Chinchwad Crime Saam Tv
क्राईम

Crime: संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्याची हत्या, अनैतिक संबंधाच्या संशयावरून संपवलं; पिंपरी-चिंचवड हादरले

Pimpari Chinchwad Crime: पिंपरी-चिंचवडमध्ये सामाजिक कार्यकर्त्याची हत्या करण्यात आल्याची घटना घडली. चारित्र्याच्या संशयावरून वाद झाला त्यानंतर बायकोनेच सामाजिक कार्यकर्त्याला संपवलं. आरोपी महिलेला अटक करण्यात आली.

Priya More

Summary -

  • पिंपरी-चिंचवडमध्ये संभाजी ब्रिगेड पदाधिकाऱ्याची हत्या

  • नकुल भोईर यांची पत्नीनेच केली हत्या

  • अनैतिक संबंधाच्या संशयावरून घडली घटना

  • मध्यरात्री कपड्याने गळा आवळून केली हत्या

  • पोलिसांनी आरोपी महिलेला केली अटक

पिंपरी-चिंचवडमध्ये हत्याकांडाची भयंकर घटना समोर आली आहे. संभाजी ब्रिगेडचा पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून प्रसिद्ध असलेल्या नकुल भोईर यांची हत्या करण्यात आली. पिंपरी-चिंचवड शहरात ही घटना घडली. चारित्र्याच्या संशयावरून बायकोनेच त्यांची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी नकुल आनंद भोईर (४० वर्षे) यांची हत्या करण्यात आली. मध्यरात्री अडीच ते पावणे तीनच्या सुमारास ही घटना घडली. नकुल भोईर आपल्या पत्नीसोबत चिंचवड पोलिस स्टेशन हद्दीत माणिक कॉलनी या ठिकाणी राहत होते. त्यांची पत्नी चैताली भोईरने (२८ वर्षे) अनैतिक संबंधाच्या संशयावरून हत्या केली. पोलिसांनी चैतालीला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नकुल हे बायको चैतालीच्या चारित्र्यावर संशय घेत होते. त्यामुळे नकुल आणि चैताली यांच्यामध्ये चारित्र्याच्या संशयावरून नेहमी वाद व्हायचे. तोच राग मनात धरून चैतालीने नकुल यांची हत्या केली. मध्यरात्री अडीचच्या सुमारास चैतालीने कपड्याच्या सहाय्याने नकुल यांचा गळा आवळत त्यांची हत्या केली. या घटनेनंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नकुल यांचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी चैतालीविरोधात गुन्हा दाखल करत तिला अटक केली. पोलिस सध्या तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalashtami 2026: यंदाच्या कालाष्टमीला 'शिव योगा'सोबत बनणार दुर्मिळ योग; पाहा कधी आहे शुभ मुहूर्त

न भूतो न भविष्यती! बायकोने दिली नवऱ्याला पोटगी अन् झाला घटस्फोट; पुण्यातील त्या कपलची गोष्ट ऐकून थक्क व्हाल

Black Saree Designs: काळ्या रंगाच्या साडीचे लेटेस्ट 5 पॅटर्न, प्रत्येक महिलेला शोभून दिसतील

Silver Coins Treasure: घराच्या खोदकामादरम्यान सापडला खजिना; बातमी गावभर पसरताच गावकऱ्यांची उडाली झुंबड

Maharashtra Live News Update: पुण्यासह राज्यात उन्हाचा तडाखा, सलग दोन दिवस कमाल तापमानाने पस्तीशी ओलांडली

SCROLL FOR NEXT