Crime News Saam tv
क्राईम

Crime News: लॉजमध्ये भयंकर कांड! सपासप वार करत गर्लफ्रेंडची हत्या, नंतर प्रियकराने स्वतःला संपवलं; पिंपरी चिंचवडमधील घटना

Pimpri Chinchwad News: लॉजमध्ये गेल्यानंतर काही वेळाने नितेश मिरेकर याने आपल्या प्रेयसीवर धारदार शस्त्राने वार केले, त्यानंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या केली.

गोपाल मोटघरे

Pimpri Chinchwad Crime: पिंपरी चिंचवड शहरातील खराळवाडी येथील एका लॉजमध्ये प्रियकराने आपल्या प्रियसीवर धारदार शस्त्राने वार करून स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये मृत तरुणाची प्रेयसी गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचादारम्यान तिचाही मृत्यू झाला. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिंपरी चिंचवड शहरातील खराळवाडी येथील एका लॉज मध्ये प्रियकराने आपल्या प्रियसीवर धारदार शस्त्राने वार करून स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रेयसीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. नितेश नरेश मिनेकर असं आत्महत्या केलेल्या प्रियकराचे नाव आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरातील खराळवाडी परिसरात असलेल्या राज लॉजमध्ये हा भयंकर प्रकार घडला. गुरुवारी दुपारी नितेश मिनेकर हा आपल्या प्रेयसीसोबत या लॉजमध्ये आला असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे. लॉजमध्ये गेल्यानंतर काही वेळाने नितेश मिरेकर याने आपल्या प्रेयसीवर धारदार शस्त्राने वार केले, त्यानंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या केली. तरुणाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रेयसीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. पिंपरी पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

कोल्हापूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत तब्बल 28 किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी राजाराम तलाव परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे. निहाल शेख (रा. धुळे) आणि चरण शिंदे (रा. सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या कारवाईत 28 किलो गांजासह 5 लाख 68 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पितृपक्षात सोनं खरेदी करावे की नाही? जाणून घ्या

Bank Scam : ६५० कोटींचा बँक घोटाळा! डान्सरवर दरमहा उडवायचा १० लाख रुपये; CBI ने 'या' मास्टरमाइंडला ठोकल्या बेड्या

Pneumonia in Children: खोकला, ताप आणि श्वास घेण्यास त्रास? मुलांमध्ये न्यूमोनियाची ही लक्षणं वेळीच ओळखा

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्र्यांकडून एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य

Maharashtra Fort : शिखरावरचं रहस्यमय शिल्प! दुरून माणसासारखा दिसतो 'हा' किल्ला

SCROLL FOR NEXT