Pimpari Chinchwad Crime saam tv
क्राईम

Pimpari Chinchwad Crime: दुचाकी चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला अटक, चाकण पोलिसांची मोठी कारवाई; १२ दुचाकी जप्त

Pimpari Chinchwad News: पिंपरी चिंचवड शहर परिसरातील चाकण पोलिसांनी सर्वात मोठी कारवाई करत दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. या कारवाईत १२ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

गोपाल मोटघरे

Pimpari Chinchwad Crime:

गेल्या काही दिवसांपासून पुणे तसेच पिंपरी चिंचवड शहर परिसरात दुचाकी चोरीच्या घटना वारंवार समोर येत आहेत. अशातच पिंपरी चिंचवड शहर परिसरातील चाकण पोलिसांनी सर्वात मोठी कारवाई करत दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. या कारवाईत १२ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. (Crime News in Marathi)

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या चाकण पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहन चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला चाकण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अशोक सोनवणे असं अट्टल दुचाकी चोराचे नाव असून, त्याच्या ताब्यातून चाकण पोलिसांनी चोरीच्या १२ दुचाकी वाहन जप्त केल्या आहेत.

चाकण पोलीस स्टेशन हद्दीतील 7 दुचाकी वाहन चोरीचे गुन्हे पोलिसांनी वरती थांबले आहेत. अशोक सोनवणे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचे पुणे, अहमदनगर आणि नाशिक या ठिकाणी वास्तव्य आहे. त्यामुळे त्याला शोधण्याचे मोठे आव्हान चाकण पोलिसांसमोर होते. मात्र पोलिसांनी योग्य तांत्रिक विश्लेषण करून अशोक सोनवणे याला बेड्या ठोकल्या आहेत.

 (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

स्पा सेंटरच्या नावाखाली भलताच प्रकार

दरम्यान, बीडच्या परळी शहरातील महेश कॉम्प्लेक्स परिसरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. या ठिकाणी फ्लोरा स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू होता. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी चौकशीसाठी २ महिलांना ताब्यात घेण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला, 'शिवतीर्थ'वर महत्वाची बैठक सुरू

Maharashtra News Live Update: उजनी धरणातील पाण्याचे ऑगस्टपर्यंत नियोजन

Gold Rate Today: अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; सुवर्णनगरीतील २२ अन् २४ कॅरेटचे दर किती?

CBSE Class 12 Result 2026: बारावीचा निकाल कधी लागणार? मोठी अपडेट समोर; मोबाइलवर रिझल्ट कसा पाहाल?

Bigg Boss Marathi 6: 'मला राकेश बापटच्या मुलांची आई व्हायचंय...'; राखी सावंतचं व्यक्त केली धक्कादायक इच्छा

SCROLL FOR NEXT