Parbhani Crime Saam tv
क्राईम

Parbhani Crime: प्रेम प्रकरणातून तरुणांची भरदिवसा हत्या; पूर्णा शहरातील घटनेने खळबळ

Parbhani News : घटनास्थळी मिळालेल्या पिस्टल आणि बुलेट सापडल्यामुळे मयतावर तत्पूर्वी गोळीबार केला असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे

राजेश काटकर

परभणी : परभणीच्या पूर्णा शहरातील श्री गुरू बुद्धिस्वामी महाविद्यालय परिसरात एकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या (Crime News) करण्यात आली. सदर घटना आज दुपारच्या सुमारास घडली असून (Parbhani) प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. (Breaking Marathi News)

परभणी जिल्ह्यातील पूर्ण शहरातील घडलेल्या या घटनेने परिसरात घाबरत पसरली आहे. घटनास्थळी मिळालेल्या पिस्टल आणि बुलेट सापडल्यामुळे मयतावर तत्पूर्वी गोळीबार केला असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. आकाश कदम असे घटनेतील मयताचे नाव असून प्रेम प्रकरणातून त्याचा खून झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक रागसूधा आर यांनी दिली. पण सदर युवकाला गोळी लागली नसल्याचा दावाही पोलीस अधीक्षक यांनी केला.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पवार नावाच्या २३ वर्षीय तरुणाचे या खून प्रकरणात नाव पुढे येत आहे. घटनेमुळे एकच खळबळ माजली असून शहरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पूर्णा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत. पुढील तपासासाठी श्वानपथक, ठसेतज्ञ यांना पाचारण करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bullet Train: रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा! 12 तासांचा प्रवास आता होणार 2 तासांत? या ठिकाणी धावणार नवीन बुलेट ट्रेन

Maharashtra News Live Update: विनायक राऊत आणि गितेश राऊत यांच्या अडचणीत वाढ

High Court : महिलेची सलवार काढणे अन् छातीला स्पर्श करणे बलात्काराचा प्रयत्न नाही; हायकोर्टाची टिप्पणी

Crime News: नागपूर हादरले! विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, अश्लिल व्हिडीओ बनवून व्हायरल करण्याची धमकी

घरातली लोक झोपलेली, दाराची कडी लावली अन् स्मार्ट मीटर बसवून गेले; महावितरणचा गजब कारभार

SCROLL FOR NEXT