Parbhani crime Saam tv
क्राईम

Parbhani Crime: क्रूरतेचा कळस! तिसरीही मुलगीच झाली म्हणून पत्नीला पेट्रोल टाकून पेटवले, परभणी हादरली

Parbhani murder case: दोन मुलींनंतर परत मुलगी झाल्याच्या रागात पतीने पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला.

Saam Tv

Parbhani Crime News: परिभणीमध्ये पतीने पेट्रोल टाकून पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तिसऱ्यांदा मुलगी झाल्यावरुन हा प्रसंग घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यात पीडित महिलेचा मृत्यू झाला आहे. ही थरकाप उडवणारी घटना परभणीतील गंगाखेड नाका परिसरात घडली आहे.

गुरुवारी (२६ डिसेंबर) रात्री परभणीमधील गंगाखेड नाका परिसरात ही घटना घडली. यात मैना काळे या महिलेचा मृत्यू झाला आहे. तिच्या पतीचे नाव कुंडलिक काळे असे आहे. तिसरीही मुलगी झाल्याच्या रागात कुंडलिक होता. तो मैनाला सतत शिवीगाळ करत असे, तिला मारहाण देखील करत असे. यावरुन झालेल्या भांडणात कुंडलिकने रागाच्या भरात मैनाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. यात मैनाचे शरीर भाजले गेले. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

मैना काळेची बहीण भाग्यश्रीने कुंडलिक विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. तिन्ही मुली झाल्याने कुंडलिक आपल्या पत्नीला मारहाण करत असे. त्यांची भांडणे सोडवण्याचा भाग्यश्रीने अनेकदा प्रयत्नही केला होता. हा प्रकार घडल्यानंतर भाग्यश्रीने आपल्या बहिणीचा खून केल्याच्या आरोप करत पोलिसांकडे तक्रार केली.

पेट्रोल टाकून जाळण्याच्या प्रयत्नानंतर मैनाला रुग्णालयात नेण्यात आले होते. उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाल्यानंतर पतीविरोधात खून केल्याचा गुन्हा कोतवाली पोलिसांत दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कुंडलिक काळेला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर पुढील कारवाई केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अल निनोमुळे राज्यात पाणी टंचाईची भीषण समस्या

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

Walking Benefits: १० मिनिटं की ६० मिनिटं; दररोज किती चाललं पाहिजे? तुमच्या आरोग्यासाठी दोघांपैकी काय ठरेल फायदेशीर?

Accident News : भाजपच्या बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात! भरधाव ट्रेलरने दिली जोरदार धडक

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

SCROLL FOR NEXT