Palghar Police Constable Santosh Zinjurde Death Case | Family Demands Fair Probe saam tv
क्राईम

Palghar Constable Death Case: पत्नीनं पोलीस नवऱ्याचा घेतला जीव? पोलीस कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनं पालघरमध्ये खळबळ

Palghar Constable Death Case: पालघर पोलीस ठाण्यातील कर्मचारी संतोष झिंजुर्डे यांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. पत्नीविरोधातील पूर्वीच्या तक्रारीचा तपास करण्याची आणि मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

Bharat Jadhav

रुपेश पाटील, साम प्रतिनिधी

पालघरमध्ये पोलीस दलालाच हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. पालघर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी संतोष झिंजुर्डे यांनी आत्महत्या केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, कौटुंबिक वादातून पत्नी मानसिक छळ करत असल्याचा आरोप संतोष यांनी यापूर्वीच केला होता. जुलै महिन्यात त्यांनी पत्नीविरोधात पालघर पोलीस ठाण्यात तक्रार अर्जही दिला होता.

मात्र, या तक्रारीवर नेमकी काय कारवाई झाली,असा सवाल आता त्यांच्या कुटुंबीयांकडून उपस्थित केला जात आहे. पत्नीविरोधात गुन्हा दाखल करून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी संतोष झिंजुर्डे यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.

पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याच्या आत्महत्येने मोठी खळबळ उडाली आहे. संतोष झिंजुर्डे असं आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून ते पालघर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. तर त्यांची पत्नी रोहिणी पालवे झिंजुर्डे या पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत.दोघांचा प्रेमविवाह झाला होता. त्यांना अपत्यही आहे. मात्र, लग्नानंतर काही काळातच कौटुंबिक कारणांवरून दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

तर संतोष यांचा मृत्यू आत्महत्या नसून त्यांना फासावर लटकवून मारण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच घटनास्थळाचा पंचनामा आणि तपास प्रक्रियेबाबतही कुटुंबीयांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, संतोष झिंजुर्डे यांच्याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेची पालघर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील चौकशी करून कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती पालघर पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लातूर-तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू|VIDEO

पुण्यात मतदारयादीत मोठा घोळ; 15 हजार मतदारांची नावं पुण्याबाहेर ट्रान्सफर?

NCPचं विलिनीकरण नको! स्वतंत्रपणे सत्तेत जाऊ, शरद पवार गटात वेगळीच चर्चा; राजकीय समीकरणांना नवं वळण

मुंबईकरांनो, तुम्ही भाड्यानं राहताय...; घराचा ताबा न सोडल्यास दुप्पट घरभाडं

अमरावती नगरपरिषदेच्या इमारतीवर मटण पार्टी; जिल्हाधिकाऱ्यांचा मुख्याधिकाऱ्यांना कारवाईचा इशारा

SCROLL FOR NEXT