Palghar News:  SaamTv news
क्राईम

Palghar Crime: निर्मात्याकडून अश्लील मेसेज अन् छेडछाड; २६ वर्षीय अभिनेत्रीची पोलिसात तक्रार, मुंबईमधील धक्कादायक प्रकार

Palghar News: भिनेत्रीने पंजाबी अल्बममध्ये काम केले आहे आणि सांगितले की आरोपी इरफान खानने नायगाव परिसरात असलेल्या बालाजी हॉटेलमध्ये अभिनेत्रीच्या पोशाखावर अश्लील टिप्पणी केली.

Gangappa Pujari

पालघर, ता. २० सप्टेंबर

Actress Accuses Producer of Molestation: गेल्या काही दिवसांपासून देशभरातून अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. कोलकातामधील डॉक्टर तरुणीवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर बदलापूरमध्येही अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचा प्रकार समोर आला होता. अशातच आता मनोरंजन विश्वातूनही एक धक्कादायक घटना समोर आली असून २६ वर्षीय अभिनेत्रीने नायगाव पोलिसात एका निर्मात्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. काय आहे हे प्रकरण? वाचा...

पालघर जिल्ह्यातील नायगाव पोलीस ठाण्यात एका २६ वर्षीय अभिनेत्रीने इरफा खान नावाच्या निर्मात्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पीडित अभिनेत्रीच्या जबाबाच्या आधारे आरोपी निर्मात्याविरुद्ध नायगाव पोलिस ठाण्यात भादंवि कलम ७८ आणि ७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. नायगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीने पंजाबी अल्बममध्ये काम केले आहे आणि सांगितले की आरोपी इरफान खानने नायगाव परिसरात असलेल्या बालाजी हॉटेलमध्ये अभिनेत्रीच्या पोशाखावर अश्लील टिप्पणी केली.

जेव्हा अभिनेत्रीने आपला राग व्यक्त केला तेव्हा निर्मात्याने तिला काम देणे बंद केले. अभिनेत्रीने निर्मात्याची मागणी न मानण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यासोबत काम करणे देखील बंद केले. मात्र काम बंद केल्यानंतरही संबंधित निर्माता पिडित अभिनेत्रीला त्रास देत होता. त्याचे फोन नंबरही ब्लॉक केले मात्र तो वेगवेगळ्या नंबरवरून कॉल करत होता, अश्लील मेसेजस पाठवत होता, असे अभिनेत्रीने आपल्या तक्रारीत म्हटले असून या सगळ्याला कंटाळून अभिनेत्रीने आता निर्मात्यावर गुन्हा नोंद केला आणि नायगाव पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली.

या आठवड्याच्या सुरुवातीला निर्मात्याने तिला आक्षेपार्ह संदेश पाठवल्यानंतर तिने पोलिसांशी संपर्क साधला. अभिनेत्याने पोलिसांना संदेशांचे स्क्रीनशॉट आणि निर्मात्याने केलेल्या कॉलचे तपशील शेअर केले आहेत. पोलिसांनी सांगितले की निर्मात्याची चौकशी केली जाईल आणि ते नायगावमधील हॉटेलचे क्लोज सर्किट टेलिव्हिजन फुटेज मिळविण्याचा प्रयत्न करतील जिथे कथित विनयभंगाची प्रथम तक्रार नोंदवली गेली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लाँग मार्चला सुरुवात, राजूर ते अहिल्यानगरपर्यंत जाणार मोर्चा

Kale Mani Mangalsutra: 'महाराष्ट्रीयन अस्सल पारंपारिक दागिना' काळे मनी मंगळसूत्राचे 5 लेटेस्ट पॅटर्न

Viral Video: साडीला लटकवून खाली उतरवलं आणि...! 200 रूपयांच्या कपड्यांसाठी मुलाचा जीव घातला धोक्यात, पाहा Video

Actor Death: ना कोणता आजार, ना काही त्रास; साऊथ सुपरस्टारच्या निधनाने मनोरंजनसृष्टीला धक्का

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना रखडलेले हप्ते मिळणार; सरकारने घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT