Odisha Crime  Saam Tv
क्राईम

Crime: तरुणाला झाडाला बांधलं, डोळ्यासमोरच गर्लफ्रेंडवर आळीपाळीने...; सामूहिक बलात्काराची भयंकर घटना

Odisha Crime: ओडिशामध्ये २० वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली. तरुणीच्या बॉयफ्रेंडला झाडाला बांधून नराधमांनी तिच्या शरीराचे लचके तोडले. या घटनेमुळे खळबळ उडाली.

Priya More

ओडिशामध्ये तरुणाच्या डोळ्यासमोर त्याच्या गर्लफ्रेंडवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. ओडिशाच्या प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गोपालपूर समुद्रकिनाऱ्यावर ही घटना घडली. पीडित मुलगी आपल्या बॉयफ्रेंडसोबत याठिकाणी फिरायला गेली होती. त्या ठिकाणी आलेल्या १० जणांनी या दोघांसोबत भयंकर कृत्य केले. तरुणाला झाडाला बांधून ठेवत त्याच्या गर्लफ्रेंडवर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. या घटनेमुळे ओडिशामध्ये खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, सामूहिक बलात्काराची ही घटना रविवारी घडली. २० वर्षीय पीडित तरुणी आपल्या बॉयफ्रेंडसोबत रज उत्सव साजरा करण्यासाठी गोपालपूर समुद्र किनाऱ्यावर गेली होती. दोघेही एका निर्जन स्थळी गप्पा मारत बसले होते. त्यावेळी ३ बाईकवरून १० जण त्याठिकाणी आले. दोघांना त्याठिकाणी एकटं पाहून आधी दोघांना त्रास द्यायला सुरूवात केली. आरोपींनी दोघांचे काही फोटो काढले आणि हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर जे घडलं ते भयंकर होतं.

आरोपींनी तरुणाला मारहाण करत एका झाडाला बांधून ठेवलं. जेणेकरून ते आपल्या गर्लफ्रेंडला वाचवू शकणार नाही. त्यानंतर आरोपींमधील तिघांनी तरुणाच्या गर्लफ्रेंडवर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. या घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. तरुणांनी आपल्या गर्लफ्रेंडसोबत पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन १० आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. यामधील ८ जणांना पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'पीडित तरुणी इतर ३ मैत्रिणींसोबत एका होस्टेलमध्ये राहत होती आणि रविवारी रज उत्सवानिमित्त ती तिचा वर्गमित्र आणि बॉयफ्रेंडसोबत समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेली होती. त्यावेळी ही भयंकर घटना घडली.' आणखी एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, अटक करण्यात आलेले आरोपी स्थानिक नव्हते आणि ते देखील रज उत्सवानिमित्त समुद्रकिनाऱ्यावर आले होते. तपासाचा एक भाग म्हणून पीडित आणि अटक केलेल्या आरोपींची वैद्यकीय चाचणी करण्यात आली.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदेड जिल्ह्यातील बारा नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी होणार मतदान

UPI New Feature VPA: पैसे ट्रान्सफर होतील झटपट; अकाउंट नंबर नसला तरी पाठवता येणार पैसे

लातूर हादरलं! मेडिकलमध्ये औषध आणायला गेलेल्या ९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

Shocking : चालक आणि नर्सच्या प्रेमाचा धक्कादायक शेवट! गर्लफ्रेंडनेच कुऱ्हाडीने वार करून बॉयफ्रेंडला संपवलं

Rice Eating Tips : दुपारी की रात्री; भात खाण्याची योग्य वेळ कोणती?

SCROLL FOR NEXT