ONLINE SHOPPING SCAM IN AKOLA saam tv
क्राईम

Online Shopping Scam : ऑनलाइन शॉपिंगच्या नावाखाली नवा स्कॅम! ऑर्डर न करताही घरी पाठवले पार्सल, ग्राहकांकडून उकळले जातात पैसे

ONLINE SHOPPING SCAM IN AKOLA : ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली ग्राहकांच्या घराच्या पत्त्यावर बोगस आणि निकृष्ट दर्जाची उत्पादने पाठवून, त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचे प्रकार सध्या वेगाने समोर येत आहेत. डिजिटल युगाचा गैरफायदा घेत सायबर भामटे अशा युक्त्या वापरून नागरिकांच्या कष्टाचे पैसे लुटत आहेत.

Saam Tv

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी

ऑनलाइन शॉपिंगच्या वाढत्या वापरामुळे सायबर भामट्यांनी आता ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन मार्ग शोधले आहेत. ग्राहकांच्या नावाने आणि घराच्या पत्त्यावर बोगस पार्सल पाठवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, ग्राहकाने कोणतीही ऑर्डर केलेली नसतानाही कुरिअरच्या माध्यमातून पार्सल घरी पोहोचवले जाते.

त्यानंतर डिलिव्हरी बॉयकडून ऑनलाइन पेमेंट करण्याचा आग्रह धरला जातो. पैसे भरल्यानंतर पार्सल उघडल्यावर त्यातील वस्तू निकृष्ट दर्जाची किंवा वापरलेली असल्याचे समोर येते. अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात असाच प्रकार घडला असून, नरेश नालट यांची ५६७ रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी अकोला पोलिसांच्या सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नेमका काय घडला प्रकार?

तक्रारदार नरेश नालट हे ऑनलाइन खरेदीसाठी 'मीशो' (Meesho) ॲपचा वापर करतात. त्यांच्या तक्रारीनुसार, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी त्यांनी कोणतीही ऑनलाइन ऑर्डर दिली नव्हती. मात्र, १४ ऑक्टोबर रोजी त्यांच्या घराच्या पत्त्यावर एक पार्सल आले. कुरिअर स्वीकारताना त्यांनी ऑनलाइन पद्धतीने ५६७ रुपये भरले. त्यानंतर पार्सल उघडून पाहिले असता त्यातील प्रोडक्ट जुने आणि वापरलेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

यानंतर त्यांनी मीशो ॲपवरील ऑर्डर हिस्ट्री तपासली असता संबंधित तारखेला कोणतीही ऑर्डर नोंदवलेली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आपण ऑर्डरच केली नसताना पार्सल कोणी पाठवले, असा प्रश्न त्यांना पडला. प्रोडक्ट परत करण्यासाठी प्रयत्न केला असता ऑर्डरच खात्यात दिसत नसल्याने अडचण निर्माण झाली. त्यांनी मीशोच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधला. मात्र समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

अज्ञात व्यक्तीने आपला ई-मेल आयडी हॅक करून किंवा वैयक्तिक माहितीचा गैरवापर करून हा प्रकार केल्याचा संशय नालट यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

ऑनलाइन शॉपिंग करताना ही काळजी घ्या

  • नेहमी अधिकृत आणि विश्वासार्ह वेबसाइट किंवा ॲपवरूनच खरेदी करा. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.

  • पहिल्यांदाच एखाद्या वेबसाइटवरून खरेदी करत असल्यास शक्यतो कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय निवडा.

  • पार्सल स्वीकारण्यापूर्वी ऑर्डर आयडी, बुकिंग तपशील आणि वस्तूची माहिती तपासा. आपण ऑर्डरच केली नसेल तर पार्सल स्वीकारू नका.

  • ऑनलाइन पेमेंट करताना पैसे योग्य कंपनी किंवा अधिकृत विक्रेत्यालाच जात आहेत ना, याची खात्री करा.

  • ई-मेल आणि शॉपिंग खात्यांचे पासवर्ड मजबूत ठेवा. संशयास्पद लॉगिन किंवा व्यवहार दिसल्यास तातडीने संबंधित कंपनी आणि सायबर पोलिसांकडे तक्रार करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत सुप्रिया सुळे आक्रमक; वंचित शेतकऱ्यांना पाच हजार रुपये देण्याची मागणी

Bigg Boss 20 : काझी तौकीरच्या एका कमेंटने मनीष गोयलचा संताप अनावर; घरात केला गोंधळ, नंतर ढसाढसा रडला

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे ₹3,000 एकत्र मिळणार? ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

Maharashtra Politics: अमित शाह यांनी अजितदादाचं जगणं मुश्लिक केलं होतं, उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप

Court Employees Strike: राज्यातील ३४००० दुय्यम न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर; कोर्टाच्या कामकाजावर होणार परिणाम

SCROLL FOR NEXT