Navi Mumbai News Saam Digital
क्राईम

Navi Mumbai News : आधार, पॅनकार्ड, रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र सर्वच बनावट; बांगलादेशी दांपत्याला पनवेलमधून अटक

Sandeep Gawade

Navi Mumbai News

ओळख लपवण्यासाठी एका बांगलादेशी दाम्पत्याने हिंदू नावाचे बनावट आधार, पॅनकार्ड, रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र तसेच बँकेचे पासबूक बनवल्याचा धक्कादायक प्रकार पनवेलमध्ये घडला आहे. दशतवादविरोधी पथकाच्या नवी मुंबई युनिटने केलेल्या कारवाईनंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. चार वर्षांपासून हे दांपत्य खरी ओळख लपवून पनवेल शहरात बेकायदा राहत असल्याची माहिती कारवाईतून उघड झाली आहे.

पनवेल तालुक्यातील कोलवाडी भागात एक बांगलादेशी नागरिक बेकायदा वास्तव्य करत असल्याची माहिती दहशतवादी विरोधी पथकाच्या नवी मुंबई युनिटला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने गुरुवारी (ता.१५) दुपारी कोलवाडीमधील पोपेटा बिल्डींगमधील एका घरावर छापा मारला होता. यावेळी घरामध्ये राहत असलेल्या रंजन सत्यरंजन दास ऊर्फ अस्लम कुडुस शेख (३५) तसेच त्याची पत्नी हुसना अस्लम शेख ऊर्फ मलिना रंजन दास (३४) या दोघांची चौकशी केली असता २०१५ मध्ये गरिबीला कंटाळून घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश केल्याचे सांगितले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तसेच या दोघांनी भारतामध्ये काम मिळवण्यासाठी मुस्लिम असल्याची ओळख लपवून हिंदू नावाने बनावट आधार, पॅन, भारतीय निवडणूक ओळखपत्र, बँकेचे पासबुक आदी कागदपत्रे बनवल्याची कबुली दिली. यावेळी दहशतवाद विरोधी पथकाने या दोघांविरोधात पनवेल तालुका पोलिस ठाण्यात बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी तसेच विदेशी व्यक्ती अधिनियम, पारपत्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच बनावट कागदपत्र बनवणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

नातेवाईकांच्या संपर्कासाठी ‘व्हॉट्सअॅप’ कॉलिंग

या कारवाईत अटक केलेले अस्लम कुडुस शेख २०१६ पासून पनवेल परिसरात मजुरीचे काम करतात. त्याची ओळख पनवेलच्या कोलवाडी परिसरात घरकाम करणाऱ्या बांगलादेशी महिला हुसना अस्लम शेखसोबत झाली होती. भारतामध्ये बेकायदेशीररित्या प्रवेश करून वास्तव्य केल्याचे समजल्यानंतर त्या दोघांनी लग्न केले होते. त्यानंतर गेल्या चार वर्षांपासून राहत असल्याचे आढळून आले आहे. तसेच हे दांपत्य बांगलादेशातील आई-वडील तसेच नातेवाईकांसाठी ‘इमो’ तसेच ‘व्हॉट्सअॅप’ कॉलिंगचा वापर केला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi Grand Finale: कोकण हार्टेड गर्ल बिग बॉसच्या घरातून बाहेर, प्रेक्षकांचे मानले आभार..

Chhagan Bhujbal : अजित पवार गटाचे बडे नेते पवार गटात जाणार; छगन भुजबळ यांनी सांगितलं विधानसभेत नेमकं गणित

SA vs IRE: दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का! तिसऱ्या वनडेतून स्टार खेळाडू बाहेर

Bigg Boss Marathi 5 च्या ग्रँड फिनालेला आर्याला नो एन्ट्री? काय आहे कारण? वाचा...

Bigg Boss Marathi Grand Finale : ग्रँड फिनालेमध्ये सूरजची झापुक झुपुक स्टाईल, पाहा Photo

SCROLL FOR NEXT