Koparkhairane Youth Commits Suicide  Saam TV News
क्राईम

Crime News : कर्ज देणाऱ्याचा सतत तगादा, कंटाळून टेरेसवर जाऊन तरुणानं आयुष्य संपवलं; चिठ्ठी लिहून एकनाथ शिंदेंना म्हणाला...

Koparkhairane Youth Commits Suicide : कर्जाच्या व्याजाला कंटाळून नवी मुंबईतील कौपरखैरणे येथील तरुणाने गळफास घेत आत्महत्या केलीय. आत्महत्येवेळी या तरुणाने चिठ्ठी देखील लिहून ठेवली आहे.

Prashant Patil

विकास मिरगणे, साम टिव्ही

नवी मुंबई : नवी मुंबईतील कोपरखैरमधील कर्जदार रवींद्र शिंदे यांनी सांताक्रुजमधील प्रथमेश चव्हाण यांच्याकडून कर्ज घेतलं होतं. त्या कर्जाचं व्याज शिंदे हे फेडत असताना चव्हाण यांनी अधिक दराची मागणी केली आणि त्रास द्यायला सुरुवात केली. या त्रासाला कंटाळून रवींद्र शिंदे यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना कोपरखैरणे परिसरात घडली आहे. यावेळी शिंदे यांनी सुसाईड नोट लिहित त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ प्रथमेश चव्हाण याला कठोर शिक्षा व्हावी याबाबत विनंती केली आहे.

रवींद्र मोहन शिंदे (वय ३९) हे कोपरखैरणेतील सेक्टर १९ मधील, श्रीनाथ आपार्टमेंटमध्ये राहतात. रवींद्र शिंदे यांनी प्रथमेश चव्हाण (वय ३०, रा. वाकोला ब्रिज जवळ, सांताक्रुज) यांच्याकडून कर्ज घेतलं होतं. रवींद्र शिंदे हे त्या कर्जाचं १२.५ टक्क्यांनी व्याज भरत होते. तरीदेखील प्रथमेश चव्हाण यांनी ३० टक्के व्याजाची मागणी रवींद्र यांच्याजवळ केली. त्यानुसार व्याजाची रक्कम भरण्यासाठी त्रास द्यायला सुरुवात केली. चव्हाण यांच्या वाढत्या त्रासाला कंटाळून रवींद्र शिंदे यांनी घराच्या टेरेसवर जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी त्यांनी सुसाईड नोट लिहिली असून, 'माझ्या मृत्यूचा जबाबदार प्रथमेश चव्हाण असल्याचा' उल्लेख केला आहे. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ प्रथमेश चव्हाण याला कठोर शिक्षेची विनंती देखील केली आहे.

नवविवाहितेने उचललं टोकाचं पाऊल

दरम्यान, नागपूरमध्ये हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून नवविवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. सासरच्यांकडून सतत होत असलेल्या मारहाणीला आणि त्रासाला कंटाळून नवविवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी या महिलेच्या नवऱ्यासह चौघांविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमध्ये हुंडाबळीची घटना समोर आली आहे. नाविवाहितेने लग्नानंतर ३५ दिवसांत सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेत आयुष्य संपवलं. नागपूरच्या बुटीबोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. मयुरी डाहुले असं आत्महत्या केलेल्या नवविवाहित महिलेचे नाव आहे. तिच्या आत्महत्येमुळे आई-वडिलांना मोठा धक्का बसला. हुंड्यापायी आपली सोन्यासारखी मुलगी गमावल्यामुळे मयुरीच्या आई-वडिलांचे रडून रडून बेहाल झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: २०२६ की २०२७; कधी होणार आठवा वेतन आयोग लागू? केंद्र सरकारने स्पष्टच सांगितलं

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी पंपासमोर ३ ते ४ किलोमीटरच्या रांगा

Mumbai : डोकं रिक्षावर आपटलं, फरफडत नेलं; ४ वर्षांच्या चिमुरड्याला अमानुष मारहाण, वसईचा व्हिडिओ पाहून काळजाचा ठोका चुकेल!

भोंदू बाबा अशोक खरातवर शिर्डीत गुन्हा दाखल; 4 एकर भूखंड बळकावला|VIDEO

Dhurandhar 2 Collection : जगभरात 'धुरंधर 2'चा धुमाकूळ; 1,400 कोटींच्या उंबरठ्यावर, रणवीर सिंहने रचला इतिहास

SCROLL FOR NEXT