Husband killed Friend Saam Tv
क्राईम

Navi Mumbai News : पत्नीसोबत अनैतिक संबंधाचा संशय, मित्रानेच मित्राला संपवलं; गोणीत गुंडाळून झुडपात फेकलं

Husband killed Friend due to suspected affair with wife In Uran : उरणमध्ये एका तरूणाने त्याच्या मित्राची हत्या केल्याची घटना घडली. पत्नीसोबतच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून त्याने हे धक्कादायक कृत्य केलंय.

Rohini Gudaghe

सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही नवी मुंबई

नवी मुंबईत पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून आपल्या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. उरणमधील जासई गावात दि.बा. पाटील सभागृहाशेजारी असलेल्या झाडाझूडपात पांढऱ्या गोणीत एक मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवत तात्काळ तपासाला सुरुवात केली होती.

पत्नीसोबत अनैतिक संबंधाचा संशय

याबाबत सविस्तर वृत्त असं की, दत्तात्रय घुटुकडे, असं मृताचे नाव असून त्याचा मित्र आरोपी बालगंधर्व गोरड याने त्याची हत्या केल्याचं निष्पन्न झालंय. बालगंधर्व आणि दत्तात्रय एकाच ट्रान्सपोर्ट कंपनीत कामाला (Navi Mumbai Crime News) होते. बालगंधर्व याला दत्तात्रयचे आपल्या पत्नी सोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. या संशयातून त्याने दत्तात्रयला आपल्या घरी दारू पिण्यास बोलावले होते.

मित्राचा खून केला

दारूची नशा चढल्यावर बालगंधर्वने दत्तात्रयच्या डोक्यात दगड टाकून हत्या केली (Husband killed Friend) होती. यावेळी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने आपली पत्नी वैशालीला मदत करण्यास भाग पाडले होते. उरण पोलीसांनी गुन्हा दाखल करत बालगंधर्व गोरड आणि वैशाली गोरड या दोघांना अटक केलीय. यासंदर्भात अधिक तपास सुरु (Crime News) आहे. पत्नीसोबतच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून धक्कादायक पाऊल उचलल्याचं समोर आलंय.

मृतदेह झुडपात फेकला

संशयाचं भूत मानगुटीवर बसलं अन् तरूणानं थेट मित्रालाच संपवल्याची घटना नवी मुंबईत घडली. मित्राचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध (affair with wife) आहे, या संशयातून तरूणाने मित्राला जिवे मारल्याची घटना उरणमध्ये घडली. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. मृतदेह गोणीत आढळल्यानंतर ही घटना उघडकीस आली होती. गोणीत गुंडाळून आरोपींनी मृतदेह झुडपात फेकून दिला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना बंद होणार? विरोधकांचा वारंवार उच्चार, थेट उत्तर देत एकनाथ शिंदेंनी विषय संपवला

पुण्यात लवकरच 'डबल डेकर ट्विन टनल'; येरवडा ते कात्रजदरम्यान होणार उभारणी, कसा आहे संपूर्ण प्रकल्प?

Vidhan Parishad Election: महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटला; भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना कोणाला किती मिळाल्या जागा?

Mishti Doi Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट घरच्या घरी बनवा गोड, मलाईदार मिष्टी दोई

Maharashtra News Live Update: पिंपरी चिंचवडमध्ये बसचालकाने दोन वाहनांना दिली जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT