Nashik Crime  Saam Tv
क्राईम

Crime News: नाशिक हादरले! लग्नाला जाण्यावरून टोकाचे भांडण, नवऱ्याने बायकोला संपवलं; मानेवर कोयत्याने सपासप वार

Nashik Crime News: लग्नाला जाण्यावरून नवरा -बायकोमध्ये टोकाचे भांडण झाले. या भांडणात संतपालेल्या नवऱ्याने बायकोची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर नवरा फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Priya More

तरबेज शेख, नाशिक

नाशिकमध्ये नवऱ्याने बायकोची हत्या केल्याची धक्कादायक घडना घडली आहे. नातेवाईकांच्या लग्नात न गेल्याने नवरा बायकोमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणातूनच नवऱ्याने बायकोच्या मानेवर धारधार शस्त्राने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. सिंदुबाई पीठे असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. हत्या केल्यानंतर तिचा नवरा फरार झाला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या सातपूर परिसरात राजवाडा येथे महिलेच्या हत्येची घटना गुरूवारी रात्री घडली. सिधुबाई पीठे (४८ वर्षे)असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. मुलगा रात्री पावणे बारा वाजता कामाहून घरी आला असता त्याला आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. आईची अवस्था बघून मुलाने आराडाओरडा केल्याने परिसरातील नागरीक मदतीला धावून आले. सिंधूबाई यांच्या मानेवर धारधार शस्त्राने वार करून त्यांची नवऱ्याने हत्या केली.

मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने सिंधूबाई यांचा जागीच मुत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी माहिती घेतली असता नवरा-बायको यांच्यात वाद झाल्यानंतर ही घटना घडल्याचे समोर आले. भांडणानंतर नवऱ्याने कोयत्याने बायकोच्या मानेवर जबर वार केले. या हल्ल्यात सिंधूबाई यांचा जागीच मृत्यू झाला.

बायकोच्या हत्येनंतर नवरा फरार झाला. याप्रकरणी नाशिकच्या सातपूर पोलिस ठाण्यात नवऱ्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा अधिक तपास सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित नालावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर गुन्हे शोध पथक करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Good News: आणखी एक वंदे भारत स्लीपर धावणार! २ महत्त्वाच्या शहरांना जोडणार; जाणून घ्या 'A टू Z' माहिती

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

5 Best Kurti Sets for Women: महिलांसाठी स्टायलिश आणि ट्रेंडी कुर्ती सेट्स, लेटेस्ट 5 डिझाईन्स

October 2026 Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद; तुमच्या राज्यात किती दिवस बँका असणार बंद

Sachin Waze: मोठी बातमी! तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे येणार तुरुंगाबाहेर; अँटिलिया स्फोटक प्रकरणी जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT