Nashik Crime Saam Tv News
क्राईम

Nashik Crime : दोघे भाऊ प्यायला सोबत गेले, परतला फक्त एकच; नाशिकच्या हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं?

Nashik Crime : नाशिकमध्ये पुन्हा एक धक्कादायक घटना घडली आहे. दोन भावांना सहा जणांच्या मद्यपींच्या टोळक्याकडून बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत एका भावाचा मृत्यू झाला आहे.

Prashant Patil

नाशिक : सध्या महाराष्ट्रात मारहाण, चोरीच्या, हत्येच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. राज्यभरातील विविध भागातून लहान-मोठ्या कारणातून गुन्हेगारीच्या घटना वाढल्याचं चित्र आहे. अशीच एक भयंकर घटना नाशिकमधून समोर आली आहे. शहरातील पाथर्डी फाटा परिसरात असलेल्या फाळके स्मारकाजवळील एका हॉटेलमध्ये मद्यपींच्या सहा जणांच्या टोळक्याकडून दोन चुलत भावांना मारहाण करण्यात आल्याची घटना काल रविवारी रात्री घडली आहे.

या मारहाणीत राम बोराडे (वय २०) याचा मृत्यू झाला असून राजेश बोराडे हा गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पोलिसांकडून सहा जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलमध्ये पाच ते सहा मद्यपी बसले होते. तिथेच दोघे चुलत भाऊ देखील बसले होते. तेथील मद्यपींकडून आमच्याकडे रागाने का बघतो म्हणून दोन चुलत भावांशी वाद घालण्याचा प्रयत्न झाला. हा वाद टोकाला पोहोचला. वाद इतका टोकाला पोहोचला, की त्याचं रूपांतर नंतर हाणामारीत झालं.

मद्यपींच्या टोळक्याकडून कोयत्याने त्या दोघं भावांवर वार करण्यात आले. राम बोराडे आणि त्याचा चुलत भाऊ राजेश बोराडे या दोघांवर पाच ते सहा जणांनी कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यामध्ये राम बोराडे याचा जागीच मृत्यू झाला असून राजेश बोराडे हा गंभीर जखमी झाला आहेत. त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दोन भावांवर हल्ला केल्यानंतर या टोळक्याने परिसरातील काही चारचाकी वाहनांची देखील तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा संशयितांना अटक करण्यात आल्याचा दावा केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT