Nashik Murder News Saam Tv News
क्राईम

Nashik Crime : गुंडांचीच 'दोस्तीत कुस्ती', नाशकात तडीपार गुंडाला पाठलाग करुन संपवलं, लेकीच्या 'बर्थडे'लाच खूनी कांड

Nashik Murder News : संशयित पेखळे याच्या घरासमोर हितेशने दुचाकी उभी करताच दोघांत बाचाबाची झाली. काही क्षणांतच गेटला अडकवलेल्या पिशवीतून पेखळे याने धारदार शस्त्र काढून हितेशच्या डोक्यात वार केला.

Prashant Patil

नाशिक : एकमेकांचे मित्र असूनही एका तडीपार गुंडासह त्याच्या साथीदाराने धारदार शस्त्राने वार करून दुसऱ्या तडीपार गुंडाची हत्या केल्याची घटना गुरुवारी १ मेला रात्री सव्वादहा वाजता जेलरोडच्या जुना सायखेडारोड भागातील बालाजीनगरात घडली.

हितेश सुभाष डोईफोडे असं मृताचं नाव आहे. हितेशचा मित्र रोहित नंदकिशोर बंग (वय २८) हा जखमी झाला असून, लपून बसल्यानं तो बचावला आहे. जखमी रोहितने दिलेल्या जबाबावरून नाशिकरोड पोलिसांनी संशयित नीलेश पेखळे आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करत काही तासात त्याला अटक केली. शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

संशयित पेखळे याच्या घरासमोर हितेशने दुचाकी उभी करताच दोघांत बाचाबाची झाली. काही क्षणांतच गेटला अडकवलेल्या पिशवीतून पेखळे याने धारदार शस्त्र काढून हितेशच्या डोक्यात वार केला. रोहित दुचाकीवरून खाली उतरत असतानाच नीलेशच्या दोघा साथीदारांनी लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यात वार केला. यामुळे रोहित खाली कोसळला. रक्तबंबाळ हितेशने जुनासायखेडा रोडच्या दिशेने जीव वाचविण्यासाठी पळ काढला. परंतु, संशयितांनी त्याचा पाठलाग करून रस्त्यात गाठून त्याची निर्घृण हत्या केली. मागे एकटाच पडून राहिलेल्या रोहितने भैरवनाथनगरच्या दिशेने पळ काढला आणि रेल्वे मार्गाच्या जवळील गवतात लपून बसला.

काही वेळाने रस्त्याने जाणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीच्या मोबाइलवरून रोहितने भावाला या हल्ल्याची माहिती दिली. त्याचा भाऊ राहुल याने रोहितला बिटको रुग्णालयात दाखल केलं. गंभीर जखमी हितेशला नीलेश पेखळे यानेच जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी तो मृत झाल्याचं सांगितलं. पोलिसांनी पेखळे याला काही तासातच अटक केली.

मृत हितेशच्या मुलीचा वाढदिवस जवळ आला होता. त्यासाठी तो मित्रांना आमंत्रण देत होता. गुरुवारी रात्रीही हितेश हा मित्र रोहितला सोबत घेऊन एकलहरे येथे एकास आमंत्रण देण्यासाठी निघाला होता. जेलरोडला गेल्यावर हितेशने अचानक संशयित नीलेशचे घर गाठले. येथे नीलेशने साथीदारांच्या मदतीने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात हितेशचा मृत्यू झाला. त्यामुळे मुलीचा वाढदिवस साजरा करण्याचं राहून गेला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bottle Gourd Leaves Benefits: आरोग्याचा खजिना, दररोज दुधी भोपळ्याची पाने चावून खाल्ल्याने होतील भन्नाट फायदे

Maharashtra Live News Update: वसई विरार महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून पृथ्वीराज बी पी यांची नियुक्ती

Shocking : धक्कादायक! भर रस्त्यात महिलेला जमिनीवर पाडलं, कपडे फाडले अन्...; कुठे घडली भयंकर घटना?

राज्याच्या प्रशासनात उलथापालथ, तुकाराम मुंढे यांच्यासह १० बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

Coconut Water Vs Sugarcane Juice: शरीरातील उष्णता घालवण्यासाठी नारळ पाणी पिणे चांगले की ऊसाचा रस? आरोग्यासाठी निवडा योग्य पर्याय

SCROLL FOR NEXT