Gangapur woman suicide Saam Tv News
क्राईम

Nashik Crime : वैष्णवी प्रकरणाची पुनरावृत्ती; सासरच्या त्रासाला कंटाळून भक्तीनं जीव दिला, अंगावरील खुणांमुळे संशय वाढला

Nashik Bhakti Gujrathi Suicide : आत्महत्येची घटना नाशिकच्या गंगापूर रोडवरील उच्चभ्रू वसाहतीत घडली आहे. भक्ती अथर्व गुजराथी (वय ३७) असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे.

Prashant Patil

नाशिक : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजे असताना, नाशिकमध्येही तशीच घटना घडलेली आहे. नाशिकच्या गंगापूर परिसरात एका विवाहितेनं आत्महत्या केली आहे. सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेनं राहत्या घरीच गळफास घेऊन जीवन प्रवास थांबवला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पती आणि सासरच्या मंडळींविरोधात गु्न्हा दाखल केला.

आत्महत्येची घटना नाशिकच्या गंगापूर रोडवरील उच्चभ्रू वसाहतीत घडली आहे. भक्ती अथर्व गुजराथी (वय ३७) असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. भक्ती यांचा अथर्व यांच्याशी ७ वर्षांपूर्वी प्रेम विवाह झाला होता. त्यांना ५ वर्षांचा एक मुलगा देखील आहे. लग्नानंतर सासरच्या लोकांकडून भक्ती यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता, असा आरोप त्यांच्या वडिलांनी केला.

सासरी त्रास दिला जात असल्यानं भक्तीच्या कुटुंबियांनी तिला माहेरी आणलं होतं. पण अथर्वनं तिला पुन्हा सासरी नेलं. पण सासरच्या लोकांकडून सुरु असलेला त्रास कायम राहिला. या जाचाला कंटाळून भक्तीनं राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्याचा शेवट केला. या घटनेनंतर भक्तीच्या आई, वडिलांनी गुजराथी कुटुंबाविरोधात पोलीस तक्रार नोंदवली. अथर्वसह त्याच्या कुटुंबावर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.

विशेष म्हणजे वैष्णवी हगवणे प्रमाणेच भक्ती गुजराथीच्या शरीरावर जखमांच्या अनेक खुणा आढळून आल्या आहेत. त्यामुळे भक्ती यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या घडवून ती आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न झाला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणी सखोल तपास करण्याची मागणी भक्तीच्या कुटुंबानं केली आहे. भक्तीच्या मुलाचा ताबा मिळावा यासाठीही तिचं कुटुंब आग्रही आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Address Update : आता घरबसल्या बदला आधारवरील पत्ता; नवीन Aadhaar App मुळे प्रक्रिया झाली सोपी

Maharashtra News Live Update: पुरंदरमध्ये शिक्षकांचे धरणे आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाविरोधात घोषणाबाजी

Viral Video: ‘मी ड्रायव्हर आहे, नोकर नाही’, सिगारेट ओढणाऱ्या प्रवाशाला ड्रायव्हरने टॅक्सीतून उतरवलं, व्हिडीओ झाला व्हायरल

Bhootam Bhayyam: 'भूतम भयम्'साठी छाया कदम यांचे भन्नाट ट्रान्सफॉर्मेशन; 'जठाई'चा लूक पाहून व्हाल थक्क

स्मार्ट मीटर बसण्यापूर्वीच ४४० व्होल्टचा झटका; पाठवलं ५ महिन्यांचं वीजबिल, धक्कादायक प्रकरणाने राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT