Nashik Crime 
क्राईम

Nashik Crime: सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण प्रकरण; ठाकरे गटाच्या महानगर प्रमुखासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Nashik Crime: ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल यांच्याविरोधात पोस्ट केल्यामुळे एका सामाजिक कार्यकर्त्याला महानगर प्रमुखाने मारहाण केली होती. याप्रकरणी भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय.

Bharat Jadhav

तरबेज शेख, साम प्रतिनिधी

नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झालाय. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे महानगर प्रमुखासह ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक केली जाणार आहे.

उपनेते सुनील बागुल यांच्याविरोधात पोस्ट केल्यामुळे ठाकरे गटाचे पदाधिकारी मामा राजवाडे यांनी सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण केली होती. मामा राजवाडे यांची महानगरप्रमुख पदी दोन दिवसापूर्वीच नियुक्ती करण्यात आली होती. दरोडा, दंगा करणे, जमाव जमवणे असे सात गंभीर गुन्हे राजवाडे यांच्याविरुद्धात लावण्यात आले आहेत. उपनेते सुनील बागुल आणि महानगरप्रमुख मामा राजवाडे यांच्यासह सात संशयितांना अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.

वाहनाचा कट लागल्याची खुन्नस; कामगाराचा खून

दुचाकीला कट लागल्याच्या रागाची खुन्नस धरुन कंपनी कामगाराचा खून केल्याची घटना नाशिकमधील अंबडमध्ये घडलीय. घराशेजारी राहणाऱ्या दोघांनी त्याचा पाठलाग करून कामगाराची हत्या केली. खुनाच्या घटनेनंतर दोन तासांतच पोलिसांनी सुफियान अनिस अत्तार (वय १८, रा. श्यामसुंदर रो हाऊस, स्वामीनगर) आणि विकी बंटी प्रसाद (वय २०, रा. स्वामी समर्थ केंद्रामागे, माऊली लॉन्सजवळ) या संशयितांना अटक केली.

प्रशांत सुभाष भदाणे (वय २५) असं हत्या करण्यात आलेल्या कामगाराचे नाव आहे. अंबडमधील स्वामीनगर येथे तो कुटुंबासह वास्तव्यास होता. मागील काही महिन्यांपासून प्रशांत भदाणे एमआयडीसीतील एका कंपनीत नोकरी करुन उदरनिर्वाह करत होता. दरम्यान त्याच्या घराच्या परिसरात राहणाऱ्या वरील संशयितांशी त्याचं भांडण झाले होते. गेल्या आठवड्याभरापूर्वी दुचाकीला कट लागल्याचा कारणातून त्यांचे भांडण झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ruchak Yog: 11 मे रोजी मंगळाच्या गोचरने बनणार रूचक राजयोग; या ३ राशी अचानक होणार गडगंज श्रीमंत

Maharashtra News Live Update: बनेश्वर क्षेत्रातील मधमाशांचा वाढता धुमाकूळ, भाविकांच्या जीवितास धोका

ठाणे रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांची गर्दी कमी होणार; मोदी सरकारने घेतला गेमचेंजर निर्णय

कृषिप्रधान देशाचा कणा अक्षरशः रडला! कांद्याला भाव किलोला फक्त ५० पैसे, ७३ पोती विकली, हातात आले ४०० रुपये

Kidney health: तुमच्या दररोजच्या या ६ सवयी किडनीला करतायत निकामी!

SCROLL FOR NEXT