क्राईम

Nashik Crime: हत्येच्या घटनांनंतर पोलीस आयुक्त कर्णिक ॲक्शन मोडमध्ये; चौकात बसणाऱ्या ६०० टवाळक्यांवर कारवाई

Nashik Crime : नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय ठरत आहे. दोन खूनाच्या घटना घडल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक ॲक्शन मोडमध्ये आलेत. आयुक्तालयाच्या विविध पथकांनी मंगळवारी अचानक धाडसत्र राबवले.

Bharat Jadhav

(तरबेज शेख)

Nashik Crime Police Commissioner In Action Mode:

नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. शहरात दोन दिवसांत दोन खूनाच्या घटना घडल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक ॲक्शन मोडमध्ये आलेत. आयुक्तांनी सर्वच डीसीपी, एसीपी आणि गुन्हे शाखेला स्ट्रीट क्राइम कमी करण्याच्या दृष्टीने कारवाया करण्याचे आदेश दिलेत.

पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार आयुक्तालयाच्या विविध पथकांनी मंगळवारी अचानक धाडसत्र राबवत चौकात आणि आडबाजूला बसून टवाळकी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आलीय. पोलिसांनी जवळपास ६०० हून आधिक टवाळक्यांवर कारवाई केलीय. तर संशयितांची चौकशीदेखील करण्यात येत आहे.

म्हसरुळ येथे सेवानिवृत्त जवानाच्या हत्येत टवाळखोरांचा सहभाग उघड झालाय. त्यानुसार कर्णिक यांच्या आदेशान्वये शहरातील टवाळखोर आणि मद्यपींवर कारवाई सुरू करण्यात आलीय. नाशिक पोलिसांकडून मंगळवारी संध्याकाळपासूनच संपूर्ण शहरात टवाळखोर आणि मद्यपींविरोधात कोंम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. पोलिसांनी शहरातील विविध उपनगरे, परिसरात रिकाम टेकड्यांवर कारवाई केली गेली.

मद्यपींनी केली निवृत्त लष्कर जवानाची हत्या

रवीदत्त राजेंद्र चौबे हे कुटुंबासह कारने जात होते. त्यावेळी सुरभी कंपनीसमोर दोन तरुण मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालत होते. त्यांनी आरडाओरड करीत वाहतूक अडवली. त्यामुळे चौबे यांनी दोघांचा पाठलाग केला. मात्र त्यापैकी एकाने चौबे यांच्या छातीत धारदार शस्त्राने वार करत त्यांची हत्या केली. ही खळबळजनक घटना म्हसरुळ-आडगाव लिंक रोडवर घडली.

मद्यपी मित्रांनी केली तरुणाची हत्या

नाशिकच्या पंचवटी परिसरात अठ्ठावीस वर्षीय तरुणाची त्याच्या मित्रांनीच निर्घृण हत्या केल्याची घटना आली आहे. सागर विष्णू शिंदे असे हत्या झालेल्या तरुणाचे होते. हत्येची घटना पंचवटी परिसरातील कुसुमाग्रज उद्यान जवळ घडली होती. कुसुमाग्रज उद्यानजवळ हे चारही मित्र मद्यपान करायला बसले होते. यावेळी मद्यपानादरम्यान जुन्या वादातून एका तरुणाने सागर शिंदे याच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यामध्ये पोटावर आणि डोक्यावर वार झाल्याने सागर शिंदे याचा जागीच मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT