Nashik Crime News Saam Digital
क्राईम

Nashik Crime News: महिलेची पोलीस ठाण्याच्या हद्दीतच होती दहशत...नाशिकमधून केले तडीपार

Nashik Crime News: नाशिक पोलिसांनी प्रथमच एका महिलेवर तडीपारीची कारवाई केली आहे. महिलेच्या विरोधात उपनगर पोलीस ठाण्यात दहशत माजवणे, खंडणी मागणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Nashik Crime News

नाशिक पोलिसांनी प्रथमच एका महिलेवर तडीपारीची कारवाई केली आहे. भारती आहिरे (वय ४५) असे या महिलेचे नाव असून या महिलेच्या विरोधात उपनगर पोलीस ठाण्यात दहशत माजवणे, खंडणी मागणे, विनयभंग सारखे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत पैसे उकळणे तसेच परिसरात दहशत निर्माण करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या अनुषंगाने नाशिक पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

नाशिकमध्ये प्रथमच एका महिलेवर जिल्हाबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आतापर्यंत ७० हून अधिक जणांवर तडीपाडची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारांवर वचक बसणार आहे त्याचबरोबर नाशिक शहरात शांतता राहण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नाशिक शहरातील जनजीवन विस्कळीत करणाऱ्या व समाजस्वास्थ बिघडवणाऱ्या गुन्हेगारांची माहिती गोळा करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. अशा गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्याची प्रक्रीया सुरू आहे. यांच्यावर पोलिसांची नजर राहणार असून नाशिक शहर किंवा जिल्ह्यात आढळल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडकी बहीण योजनेवर टांगती तलवार? महिलांचं टेंन्शन वाढलं

सुनिल तटकरेंना कोण करतंय टार्गेट? बड्या नेत्याच्या विधानाने राष्ट्रवादीच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

ऐन सणासुदीत टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन महागलं; गॅसचा भडका, टोलच्या दरातही वाढ

पुणे शिक्षक मतदारांच्या यादीत अजब घोळ, मतदाराचं नाव 'बॉम्बस्फोट', वडिलांचं नाव 'बॉम्ब'

Diabetes Blood Sugar: रक्तातील साखर अचानक कमी झाली तर काय खावं?

SCROLL FOR NEXT