Crime Saam tv
क्राईम

Nashik News: दारुसाठी ५०० रूपये घेतले, जन्मदात्याने पोटच्या गोळ्याला संपवले, नाशकातला धक्कादायक प्रकार

Nashik Shocking Incident: दारुसाठी मध्यरात्री धिंगाणा करणाऱ्या तरुणाला त्याच्या वडिलांनी मारहाण केली. बेदम मारहाण झाल्यानंतर वेळेत उपचार न झाल्याने तरुणाचा मृत्यू झाला.

Saam Tv

Nashik Crime News: नाशिकमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. भाच्याने केलेल्या मारहाणीमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. मारहाणीमध्ये मृत तरुणाचा वडिलांचाही समावेश असल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. हा प्रकार नाशिक रोड पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडला आहे.

सुनील सूर्यवंशी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. वडिलांसह भाच्याने केलेल्या मारहाणीत सुनीलचा जीव गेला असल्याची माहिती नाशिक रोड पोलिसांनी दिली आहे. त्यांनी दोघांना बेड्याही ठोठावल्या आहेत. योग्य वेळी उपचार न मिळाल्याने सुनीलचा मृत्यू झाला असे पोलिसांनी म्हटले आहे.

मध्यरात्री दारु पिऊन सुनील त्याच्या घरात धिंगाणा घालत होता. त्याचे वडील नानाजी सूर्यवंशी यांच्याशी तो भांडण करु लागला. भांडणात सुनीलचा भाचा नानाजींच्या बाजूने भांडू लागला. सुनीलने मद्यपान करण्यासाठी त्याच्या वडिलांकडे ५०० रुपये मागितले होते. पैसे देण्यास नकार दिल्याने सुनीलने मध्यरात्री धिंगाणा सुरु केला.

मध्यरात्री दारु पिऊन सुनील त्याचे वडील नानाजी सूर्यवंशी यांच्याशी तो भांडण करु लागला. भांडणात त्याचा भाचा नानाजींच्या बाजूने भांडू लागला. सुनीलने मद्यपान करण्यासाठी वडिलांकडे ५०० रुपये मागितले होते. पैसे देण्यास नकार दिल्याने सुनीलने मध्यरात्री धिंगाणा सुरु केला. पुढे भांडणात वडिलांना आणि भाच्याने त्याला मारहाण केली. बेदम मारहाणीत तो जखमी झाला. जखमी अवस्थेत असताना सुनीलला रुग्णालयात बाहेर ठेवून त्याचा भाचा पळून गेला. उपचार करण्यास विलंब झाल्याने सुनील सुर्यवंशीचा रुग्णालयाबाहेर मृत्यू झाला.

ही बातमी कळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपासाला सुरुवात केली. पुढे त्यांनी दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सुनीलचे वडील आणि त्याचा भाचा या दोघांना अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

Actress Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, वृद्धाश्रमात घेतला अखेरचा श्वास

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Bike Mileage: बाईकला किती स्पीडमध्ये चालवली तर चांगलं मायलेज मिळतं? जाणून घ्या योग्य स्पीड

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

SCROLL FOR NEXT