Nashik City Bus Women Viral Video  Saam Tv News
क्राईम

Nashik Crime : ड्रायव्हरनं बस थांबवलीच नाही, महिलेचं रुद्रावतार; लेकरासह ११ किमी पाठलाग, चालकाची गचांडी धरली; VIDEO

Nashik City Bus Women Viral Video : नाशिक महापालिकेच्या सिटी बसचालकावर एक महिला चांगलीच संतापल्याचं पाहायला मिळालं. बसचालक आणि वाहकासमोर महिलेचा रुद्रावतार पाहून स्थानिक प्रवासीही अचिंबित झाले होते.

Prashant Patil

नाशिक : नाशिक शहर आणि परिसरात काल मंगळवारी सायंकाळी ५ नंतर वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर, खासगी आणि सार्वजनिक वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला. यादरम्यान, महापालिका सिटी बसचालक आणि एका महिलेचा चांगलाच वाद झाला असून या वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, बस न थांबवल्याच्या रागातून महिलेकडून बस चालकाची कॉलर पकडून त्याला जाब विचारला जात आहे. त्यावर, तुम्ही मारहाण करू नका, हवं तर माझी तक्रार करा, असं बस चालक बोलताना पाहायला मिळत आहे.

नाशिक महापालिकेच्या सिटी बसचालकावर एक महिला चांगलीच संतापल्याचं पाहायला मिळालं. बसचालक आणि वाहकासमोर महिलेचा रुद्रावतार पाहून स्थानिक प्रवासीही अचिंबित झाले होते. नाशिकमध्ये महिलेकडून सिटी बस थांबविण्याचा प्रयत्न करूनही बस न थांबल्याने महिला संतापली होती. काल मंगळवारी सायंकाळी मुसळधार पावसात महिलेकडून सिटी बस थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, चालकाने बस थांबवलीच नाही. केलं.

आपल्या लहान बाळासह महिला बसच्या मागे धावत गेली, तरी देखील बस निघून गेल्याने महिला जास्त संतप्त झाली होती. त्यानंतर, महिलेने निमाणी बस स्थानकापासून ते नाशिकरोड पर्यंत असा ११ किलोमीटरपर्यंत रिक्षाने बसचा पाठलाग केला. तसेच, नाशिकरोड बस स्थानकात बसचालकाला चांगलेच धारेवर धरलं. यावेळी, बस का थांबवली नाही, याचा जाब विचारत महिलेनं चक्क बस चालकाची कॉलर पकडली होती. हे दृश्य पाहून स्थानिक प्रवाशांनी मध्यस्थी करत महिलेला शांत केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विरार पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर स्कूल बसमध्ये बिघाड

Shiv Sena Symbol Dispute: खरी शिवसेना कोणाची? पक्ष, चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात उद्या पुन्हा होणार सुनावणी

Tax Refund: ITR भरल्यानंतरही रिफंड आला नाही? तुमची ही एक चूक पडू शकते महागात

SA20 Season 5: पाचव्या सिझनच्या ऑक्शनपूर्वी MI केपटाऊनचा मोठा निर्णय; कायरन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्टला केलं रिलीज

केळी खाल्ल्यानंतर पाणी प्यायलं तर शरीरात काय होतं? घाबरून जाण्यापूर्वी हे वाचा

SCROLL FOR NEXT