Nanded Crime News Saam tv
क्राईम

Nanded Crime News: आई घरात नसल्याचा फायदा घेत ८ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; नांदेडमधील संतापजनक घटना

Crime News: आई घरी आल्यावर मुलगी घरात रडत बसलेली दिसली. त्यावेळी तिने मुलीला विश्वासात घेत सर्व माहिती जाणून घेतली. घटना समजताच आईच्या पायाखालची जमीन सरकली.

साम टिव्ही ब्युरो

संजय सूर्यवंशी

Nanded News:

नांदेडच्या अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. शुक्रवारी एका ८ वर्षाच्या मुलीवर माथेफिरू इसमाने अत्याचार केलाय. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

घटना घडली त्यावेळी ही लहान मुलगी घरी एकटीच होती. तिची आई घरी नसल्याचे पाहून त्याने घरात प्रवेश केला. चिमुकली आरडाओरडा करू लागल्यावर त्याने तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली आणि अत्याचार केला. आई घरी आल्यावर मुलगी घरात रडत बसलेली दिसली. त्यावेळी तिने मुलीला विश्वासात घेत सर्व माहिती जाणून घेतली. घटना समजताच आईच्या पायाखालची जमीन सरकली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्धापूर तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर त्याच गावातील एका माथेफिरू इसमाने अत्याचार केलाय. पीडित मुलीने आपल्या आईला झालेल्या घटनेची माहिती सांगितली. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.

तव्याव बसणाऱ्या भोंदूबाबाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

काही दिवसांपूर्वी अमरावतीमधील तव्यावर बसणारा एक बाबा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या बाबाने एका महिलेवर सलग ३ महिने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर प्रकरणी महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केल्यावर तो फरार झाला होता. सलग १८ दिवस शोध घेतल्यावर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जावळी तालुक्यात गारांसह पडलेल्या पावसामुळे काढणीस आलेल्या पिकांचे मोठे नुकसान

Crime: १७ वर्षीय मुलाकडून ३ अल्पवयीन मुलींवर बलात्कार, व्हिडीओ काढून ब्लॅकमेल; १ पीडिता गरोदर

Chanakya Niti: दिसायला भोळे पण प्रत्यक्षात खूप चतूर असणारे मित्र कसे ओळखायचे? वाचा चाणक्य निती

Pune Crime : पुण्यातील तरुणाच्या हत्येचं धक्कादायक कारण उघड; मैत्रिणीनं नेमका काय मेसेज केला होता?

Chanderi Saree Types: लग्नसराई आणि समारंभासाठी चंदेरी साडीचे ७ सुंदर ट्रेंडी पॅटर्न नक्की करा ट्राय

SCROLL FOR NEXT