Crime News Saam tv
क्राईम

Nanded News: अनैतिक संबंधातून जन्मलेल्या नवजात मुलीला प्रियकराने संपवलं, मृतदेह नदीत फेकला; परिसरात खळबळ

23 days old girl Killed In Nanded: नांदेडमध्ये २३ दिवसाच्या नजवात मुलीची हत्या झालीय. मृत्यूनंतर तिचा मृतदेह नदीत फेकून दिल्याचं समोर आलंय.

Rohini Gudaghe

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही नांदेड

नांदेडमध्ये अनैतिक संबंधातून जन्मलेल्या मुलीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने जन्मल्यानंतर २३ दिवसानंतर या मुलीची हत्या करून मृतदेह नदीत फेकला होता. प्रियकरानेच अनैतिक संबंधातून जन्मलेल्या २३ दिवसाच्या नवजात मुलीला संपवल्याचं समोर आलंय. या घटनेमुळे नांदेडमध्ये मोठं संतापजनक वातावरण असल्याची माहिती मिळतेय.

नेमकी काय आहे घटना?

नांदेड जिल्ह्यातील एका विधवा महिलेचे तिच्या नात्यातीलच एका विवाहित पुरुषाशी अनैतिक संबंध होते. या संबंधातून या दोघांना एक मुलगी झाली. परंतु आरोपीच्या कुटुंबीयांचा या संबंधाला कडाडून विरोध (Nanded Crime News) होता. त्यामुळे आरोपीच्या घरी तणावाचं वातावरण होतं, त्यात मुलगी झाल्यामुळे सारखी भांडणं देखील होत होती. या सगळ्यातून सुटका मिळविण्यासाठी आरोपीने मुलीला संपवण्याचा निर्णय घेतला.

नांदेडमध्ये २३ दिवसाच्या चिमुकलीची हत्या

आरोपी शेषेराव भुरे याने अनैतिक संबंधातून जन्मलेल्या त्याच्या २३ दिवसाच्या मुलीची गळा आवळून हत्या (Nanded News) केली. हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने मुलीला लेंडी नदी पत्रात फेकून दिलं होतं. याप्रकरणी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपी शेषेराव भुरे याला ताब्यात घेतलंय. याप्रकरणी अधिकचा तपास करत (Immoral Relations) असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंझारे यांनी दिलीय. तर आरोपींनी पोलीस चौकशीत गुन्हा कबूल केल्याची माहिती मिळत आहे.

बॅगेत मृतदेह सापडल्याची घटना

दादर रेल्वे स्थानकात काल रात्री एका बॅगेत मृतदेह सापडला होता. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलंय. आपापसातील वादामुळे आरोपींनी खून केल्याची घटना घडलीय. पायधूनीच्या किक्का स्ट्रीटवर हत्या केल्याचं समोर (Crime News) आलंय, तर आरोपी आणि मृत व्यक्ती मूक बधीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ११ वर बॅगेत मृतदेह सापडला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO : खासगी नोकरदारांसाठी गुड न्यूज! जास्त पेन्शनचा मार्ग मोकळा? हायकोर्टाने काय सांगितलं?

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

Pune : पुण्यात खळबळ! रिसॉर्टवरील देहविक्रीचा पर्दाफाश; १००० रुपयांमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय

Boiled egg storage: उकडलेली अंडी किती दिवस फ्रिजमध्ये सुरक्षित राहू शकतात?

Toilet Paper : टॉयलेट पेपरचा अतिवापर पडेल महागात, होऊ शकतात 'हे' ५ गंभीर आजार

SCROLL FOR NEXT