Nagpur crime news Saam tv
क्राईम

शाळा सुटल्यानंतर दहावीच्या विद्यार्थिनीचा पाठलाग; एकट्यात गाठून अल्पवयीन मुलाने धारदार शस्त्राने संपवलं, नागपुरात खळबळ

Nagpur crime news : नागपुरात दिवसाढवळ्या विद्यार्थिनीची हत्या झाल्याची घटना घडली. १६ वर्षीय मुलीच्या हत्येने खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

नागपुरातील घटनेमुळे महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेविषयी पुन्हा चर्चेची आवश्यकता

स्थानिक नागरिक आणि कुटुंबात भीतीचं वातावरण

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तत्काळ पंचनामा, मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवल्याची माहिती मिळाली

शाळकरी मुलींच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

नागपूर : नागपुरात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागपुरात शाळेजवळ एका अल्पवयीन विद्यार्थिनीची हत्या केल्याची घटना घडली आहे. नागपुरातील अजनी रेल्वे कॉलनी परिसरात असलेल्या शाळेपासून काही अंतरावर अल्पवयीन मुलींची हत्या झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. शाळकरी मुलीच्या हत्येने महिलांच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील अजनी रेल्वे कॉलनी परिसरात धारदार शस्त्राने वार करत विद्यार्थिनीची हत्या केल्याची घटना घडली. अजनी रेल्वे कॉलनी परिसरात शाळेपासून काही अंतरावर असताना 16 वर्षी मुलीची हत्या करण्यात आली. मुलगी 10व्या वर्गात शिक्षण घेत होती. शाळा सुटल्यावर घराकडे जाताना असताना अचानक अल्पवयीन आरोपीने तिला बोलण्यासाठी थांबवलं. पण ती निघून गेली. एवढ्यातच दुचाकीने आलेल्या अल्पवयीन आरोपीने मुलीवर चाकूने हल्ला केला.

आरोपीच्या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी होऊन ओरडत असताना रक्तस्त्राव झाल्यानंतर मुलीचा मृत्यू झाला आहे. आरोपी मुलगा 17 वर्षीय अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तो रामबाग भागातील राहवासी आहे. सपासप वार केल्यानंतर मुलगा फरार झाला. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

अल्पवयीन मुलीची हत्या झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणात हत्येचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरु केला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आरोपी मुलाने मुलीची हत्या का केली, याचा तपास पोलिसांकडून सुरु करण्यात आला आहे. तर मुलीच्या हत्येने पीडित मुलीच्या कुटुंबीयांकडून आक्रोश व्यक्त होत आहे. अल्पवयीन मुलाने विद्यार्थिनीची हत्या केल्याने परिसरातील स्थानिकांकडून कारवाईची मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Court Fine: प्रसिद्ध अभिनेत्रीला मोठा झटका, ग्राहक आयोगाने ठोठावला ४.२५ लाखांचा दंड; नेमकं कारण काय?

Maharashtra News Live Update: राज्य सरकार विरोधात सोलापुरात हजारोच्या संख्येने शिक्षक उतरले रस्त्यावर

Monsoon Health: पावसाळ्याच्या दिवसात सकाळी उठल्यावर ही 3 लक्षणं दिसली तर समजा हार्ट अटॅक येणारे!

नव्या नवरीसाठी १ ग्रॅम मंगळसूत्राच्या लेटेस्ट डिझाईन्स; गळ्यात दिसतील उठून

Beed Crime: बीड हादरले! ऊसतोड मजुराचे अपरहण, ४ दिवस डांबून ठेवत रक्त येईपर्यंत मारहाण; तोंडात लघुशंका केल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT