Nagpur Latest News:  Saamtv
क्राईम

Nagpur Crime: जुन्या वादातून भयंकर कांड... मकोकाची कारवाई झालेल्या आरोपीकडून तरुणाची हत्या; नागपुरात खळबळ

Nagpur Latest News: अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हावरापेठ येथे गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या एकाची मकोकाची कारवाई झालेल्या आरोपीकडून खून करण्यात आला.

Gangappa Pujari

पराग ढोबळे, नागपूर|ता. २७ एप्रिल २०२४

गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या एकाचा मकोकाची कारवाई झालेल्या आरोपीकडून निर्घुण खून करण्यात आल्याची घटना नागपूरमध्ये घडली. या धक्कादायक घटनेने शहरात खळबळ उडाली असून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हावरापेठ येथे गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या एकाची मकोकाची कारवाई झालेल्या आरोपीकडून खून करण्यात आला. जुन्या वादातून हत्या घडल्याचे पोलिसांकडून सांगितले जात असले तरी दोन टोळ्यांमधील वर्चस्वाच्या वादातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

अमोल मेहेर असे मृत युवकाचे नाव असून तो प्रॉपर्टी ब्रोकरचा काम होता. त्यावर गुन्हे दाखल होते. तर रजत उर्फ लल्ला शर्मा असे मारेकरी तरुणाचे नाव असून त्याच्यावर सुद्धा गंभीर गुन्हे दाखल आहेत.

आरोपीसोबत अमोलचे बऱ्याच दिवसापासून जुने वाद होते. अमोल हा राहत्या परिसरात मित्राकडे गेला असता तिथेच त्याला साथीदारांनासोबत घेरून शस्त्राने मारहाण केली. ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी रजत किशोर शर्मासह अन्य दोघांना अजनी पोलिसांनी अटक केली आहे. तसेच पुढील तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मित्रानेच खुपसला भारताच्या पाठीत खंजीर, भारतीय तेल टँकरवर इराणची फायरिंग

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : बिग बॉस मराठीच्या घरातील 'रणरागिणी' चा पत्ता कट; शेवटच्या क्षणी बाजी पलटली | VIDEO

अमेरिका इराण युद्ध पुन्हा भडकणार? होर्मुझवरुन इराणचा अमेरिकेला इशारा

TCS धर्मांतर प्रकरणानंतर मुंबईतही धक्कादायक प्रकार; प्रेमाच्या बहाण्याने १६ वर्षीय तरुणीला पळवलं

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी आवकाळी पाऊस

SCROLL FOR NEXT