Nagpur News Google
क्राईम

Nagpur: दारूसाठी नवऱ्याचा बायकोकडे पैशांसाठी तगादा; वैतागलेल्या पत्नीने विषयच संपवला, परिसरात खळबळ

Nagpur Crime News: दारू प्यायला पैशांचा तगादा लावणाऱ्या पतीच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. अरुणा पाटील असं 45 वर्षीय आरोपी पत्नीचं नाव आहे.

Vishal Gangurde

पराग ढोबळे, नागपूर

Nagpur Crime News In Marathi:

दारू प्यायला पैशांचा तगादा लावणाऱ्या पतीच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. आनंद भय्यूजी पाटील असं 50 वर्षीय मृतकाचं नाव आहे. अरुणा पाटील असं 45 वर्षीय आरोपी पत्नीचं नाव आहे. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. त्यानंतर ही घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. महिलेने 15 तासांपेक्षा अधिक काळ मृतदेहासोबत काढल्यानंतर स्वतः पोलिसांना जाऊन माहिती दिली. (Latest Marathi News)

नेमकं काय घडलं?

शनिवारी रात्री कामठी तालुक्याच्या नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील आवंढी गावात ही घटना घडली. पतीने दारू पिण्यासाठी पैसे मागितल्याने वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने पत्नीने त्रास देणाऱ्या पतीच्या डोक्यात झोपेतच दगड घातला. मध्यरात्रीच्या 3 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

मृतक आनंद पाटील हा मिळेल त्या ठिकाणी घर बांधकामावर मजूर म्हणून काम करीत होता. त्याला दारूचं व्यसन होतं. त्यामुळे पती-पत्नीत नेहमी वाद होत असत. शनिवारी रात्री मृतक आनंदन पत्नीला दारू पिण्यासाठी पैसे मागितल्याने दोघात झालेला वाद हा विकोपाला गेला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पत्नीने विषयच संपवला

पत्नीने दारूवरून नेहमी होत असलेल्या भांडणाला कंटाळून पती झोपी गेला. डोक्यात असलेल्या रागामुळे त्याच्या डोक्यात दगड घातला. घटनेनंतर तब्बल 15 तास उलटल्यावर रविवारी सायंकाळी 6 वाजता स्वतः नवीन कामठी पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी घटनेची शहानिशा करण्यासाठी पंचनामा केला. नवीन कामठी पोलिसांनी पत्नी अरुणा पाटीलच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. दोघांना मयूर नावाचा एकुलता एक मुलगा आहे. तो घटनेच्या दिवशी घरात नव्हता. मात्र दारूच्या व्यसनाने पुन्हा एक कुटुंब उध्वस्त झाल्यानं सर्वत्र हळहळ केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Washim Accident : ट्रक उलटला, आंबे पळवण्यासाठी मोठी झुंबड उडाली, व्हिडिओ पाहून डोक्याला हात माराल

Pawar vs Pawar : 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत, मतदानाच्या दिवशीच रोहित पवारांचे संकेत

आरोग्य यंत्रणेचा 'डेड रिपोर्ट'! 108 नंबरला क़ॉल, अ‍ॅम्ब्युलन्स 40 मिनिट लेट, रुग्णाचा मृत्यू

Bhandara Accident : लग्न लावून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळाचा घाला; ५ ठार, २ गंभीर

आमदार गायकवाडांच्या गुंडगिरीला पुन्हा ऊत, पानसरेंच्या पुस्तकावरून गायकवाडांची 'बॉक्सिंग'

SCROLL FOR NEXT