Nagpur Crime News Saam Digital
क्राईम

Nagpur Crime News: दारू पिण्यावरून झाला वाद, चाकूने भोसकून मित्राचाच केला खून

Nagpur Crime News: क्षुल्लक कारणातून मित्राने मित्राची चाकू भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना नागपूर लकडगंज पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Nagpur Crime News

क्षुल्लक कारणातून मित्राने मित्राची चाकू भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना नागपूर लकडगंज पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली आहे. शुक्रवारी रात्री ही घटना घडली असून विजय चव्हाण असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी विजय उर्फ भैरव डायरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय चव्हाण आणि भैरव डायरे या दोन मित्रांचा टेलिफोन एक्स्चेंज परिसरात देशी दारू दुकानाजवळ वाद झाला. थोड्यावेळात या वादाचे हाणामारीत रूपांतर झाले. यावेळी रागाच्या भरात भैरव डायरे याने विजय चव्हाणचा चाकूने भोसकून खून केला. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेतला. तसेच संशयित आरोपी भैरवला अटक केली आहे. दरम्यान हे दोघेही मित्र असून दोघांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. तसेच दारू पिण्यावरून या दोघांच्यात वाद झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त गोरख भांबरे यांनी दिली. या प्रकरणाचा पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Airstrike : पाकिस्तानचा अफगाणिस्तान एअरस्ट्राइक; मध्यरात्रीच्या हवाई हल्ल्यात ५ मुलांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत

Maharashtra News Live Update: अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार निश्चित

Dahi Kadhi Recipe : ना फुटेल, ना चव बिघडेल! एकदा 'अशी' बनवून पाहा दही-कढी

IND vs SL : भारताचा श्रीलंकेवर १२४ धावांनी दणदणीत विजय; अंतिम सामन्यात पाकिस्तानशी महामुकाबला

Benefits of Squats: वजन कमी करायचं आहे? मग रोज सकाळी १० मिनिटं स्क्वाट्स एक्सरसाइज नक्की करा

SCROLL FOR NEXT