Boyfriend Killed girlfriend Saam Tv
क्राईम

Nagpur Crime : ५७ वर्षाच्या प्रियकराने केली प्रेयसीची हत्या, मृतदेह जंगलात फेकला, धक्कादायक कारण समोर

Boyfriend Killed girlfriend Due To extra marital affair : नागपूरमध्ये एका व्यक्तीने त्याच्या प्रेयसीची हत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला काल बेड्या ठोकल्या आहेत.

Rohini Gudaghe

पराग ढोबळे, साम टीव्ही नागपूर

नागपूरमध्ये एका व्यक्तीने त्याच्या प्रेयसीचा खून केल्याचं समोर आलंय. तरूणी लग्नासाठी दबाव टाकत होती, त्यामुळे संतापलेल्या व्यक्तीने टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलंय. आरोपीने घटनेनंतर तरूणीच्या मृतदेहाची जंगलात विल्हेवाट लावल्याचं सांगितलं आहे. या घटनेने नागपूरमध्ये मोठी खळबळ उडालेली आहे.

प्रेयसीची हत्या केल्याची घटना

याबाबत सविस्तर वृत्त असं की, विवाहबाह्य संबंधात लग्नाचा दबाव टाकणाऱ्या प्रेयसीची प्रियकराने गळा आवळून हत्या केलीय. आरोपीला मानकापूर पोलिसांनी १० सप्टेंबर रोजी अटक केली (Nagpur Crime News) आहे. महेश वळस्कर ( वय 57) असं आरोपीचं नाव आहे. तर प्रिया बागडी उर्फ प्रिया गुलक, असं हत्या झालेली प्रेयसीचं नाव असल्याची माहिती मिळतेय.

विवाहबाह्य संबंधात लग्नाचा दबाव

प्रिया मागील सहा वर्षांपासून गोधणी परिसरात राहत होती. याच परिसरात आरोपी महेश वळस्कर याची पावडर बनवण्याची कंपनी आहे. ती या कंपनीमध्ये कामाला होती. कामावर असताना आरोपीचं तिच्यासोबत प्रेमाचं सुत (Boyfriend Killed girlfriend) जुळलं. परंतु नंतर तरूणी लग्नासाठी तरूणावर दबाव टाकत होती. दरम्यान १६ ऑगस्ट पासून तरूणी बेपत्ता होता. तिच्याशी कोणताही संपर्क होत नव्हता. तिच्या खोलीला कुलूप लागली असल्याने प्रियाच्या आईने ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली होती.

पोलिसांनी ठोकल्या आरोपीला बेड्या

यानंतर पोलिसांनी तपास सुरू (Nagpur News)केला. आरोपी महेशच्या रामटेक येथील हॉटेलवर प्रिया अधूनमधून राहायची, अशी माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी आरोपीची कसुन चौकशी घेत. संशयावरून त्यांनी महेशला ताब्यात घेत चौकशी सुरू केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीने तरूणीची हत्या करून मृतदेह जंगलात गाडला असल्याची कबुली दिलीय. या माहितीवरून पोलीस पुढील तपास करत आहे. मृत तरूणीचा मृतदेह अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला (Crime News) नाही, पोलीस शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

Dombivli Crime: संतापजनक! मदतीसाठी बोलावलेल्या मित्राकडूनच अनाथ तरुणीवर अत्याचार

SCROLL FOR NEXT