Saamtv
क्राईम

Nagpur Crime: भावी खासदार कोण होणार? पारावर चर्चा सुरू असतानाच तरुणांमध्ये राडा; एकाचा जागीच मृत्यू

Nagpur Breaking News: लोकसभा निवडणुकांच्या निकालावरुन दोन गटात झालेल्या वादात एका तरुणाचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Gangappa Pujari

पराग ढोबळे, नागपूर|ता. २४ मे २०२४

लोकसभा निवडणुकीत कोण जिंकणार? यावरुन झालेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नागपुरमध्ये घडली. नागपुरच्या नरखेड तालुक्यात घडलेल्या या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

ही धक्कादायक घटना नरखेड तालुक्यातील सिंगारखेडा गावातील आहे. रामटेक लोकसभा मतदार संघात येणाऱ्या या गावात लोकसभा निवडणुकांच्या निकालावरुन जोरदार राडा झाला. यावेळी झालेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला. या खळबळजनक घटनेने संपूर्ण नागपूर जिल्हा हादरुन गेला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, गावातील पारावर बसलेल्या तरुणांमध्ये रामटेक लोकसभा निवडणूक कोण जिंकणार? यावर चर्चा सुरू होती. ही चर्चा सुरू असतानाच वाद वाढत गेला आणि त्याचे पुनर्वसन जोरदार हाणामारीत झाले.

या मारहाणीत जबर मार लागल्याने सतीश फुले या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी प्रवीण बोरडे याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, लोकसभेच्या निकालावरुन झालेल्या या हत्येने परिसर हादरुन गेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO Update: महत्वाची बातमी! PF काढण्याचे नियम बदलले, हा फॉर्म भरला नाही तर पैसे अडकणार?

Maharashtra News Live Update : खासदार सुप्रिया सुळेंना बसला वाहतूक कोंडीचा फटका

Press Freedom Index : प्रेस स्वातंत्र्यात 180 देशांमध्ये भारत १५७ व्या क्रमांकावर, 6 अंकांनी घसरला

पालघर हादरले! एकाच ठिकाणी २ तरूणांचे आढळले मृतदेह; आत्महत्या की घातपात, नेमकं झालं काय?

HSC Result 2026: बारावीचा निकाल कुठे आणि कसा पाहायचा? या एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT