सुनेने सासूचे सोन्याचे दागिने चोरल्याचा आरोप
नागपुरात सासूने सुनेविरोधात पोलिसांत तक्रार दाखल
आयफोनच्या हौसेपायी सोन्याचे दागिने चोरल्याचा आरोप
महागड्या स्मार्टफोन किंवा आयफोनची क्रेझ सध्या तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. मात्र, हीच आयफोनची हौस भागवण्यासाठी एका सुनेने चक्क आपल्याच सासूच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात समोर आलाय...नेमकं प्रकरण काय? पाहूयात.
ग्रंथाली वर्मा असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी सुनेचे नाव असून, राधा वर्मा असे तक्रारदार सासूचे नाव आहे. सासू राधा वर्मा यांना शिर्डीला दर्शनासाठी जायचं असल्यानं त्यांनी पैसे आणि दागिने घेण्याच्या उद्देशानं कपाट उघडलं तेव्हा त्यातून 5 तोळे सोनं गायब झाल्याचं सासूच्या निदर्शनास आलं. सुनेला याबाबत विचारणा केली असता, तिने दागिने चोरल्याची कबुली देत ते परत करण्याचे आश्वासन दिले.
मात्र, वारंवार सांगूनही दागिने परत न केल्याने अखेर सासूने पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत सुनेने दागिने चोरून विकल्याची आणि त्यातून आयफोन खरेदी केल्याची कबुली दिलीय. आता नागपूरातील शांतीनगर पोलिसांनी आरोपी सुनेविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केलाय. आयफोनची क्रेझ आणि चुकीच्या हव्यासापोटी विश्वासाची नाती देखील कशी धुळीस मिळू शकतात? हेच या घटनेनं अधोरेखित झालयं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.