nagpur crime  Saam Tv
क्राईम

Nagpur Crime : डमी ग्राहक पाठवला, नंतर पोलिसांनी छापा टाकला; स्पा सलूनच्या नावाने सुरु होता भलताच व्यवसाय

Vishal Gangurde

पराग ढोबळे, नागपूर

Nagpur Crime news :

नागपूरच्या अंबाझरी पोलिसांनी शहरात मोठी कारवाई केली आहे. ड्रीम सलून आणि स्पाच्या नावाखाली सुरू असलेला देहव्यापाराच्या अड्ड्यावर मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून देहव्यापाराचा व्यवसाय उघडकीस आणला. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे (Latest Marathi News)

पोलिसांकडून एकाला अटक अन् दोघे फरार

नागपूरच्या अंबाझरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील टिळक नगर परिसरात ड्रीम सलून आणि स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या देहव्यापाराच्या अड्ड्यावर गुन्हे शाखेवर कारवाई केली. डमी ग्राहक पाठवून केलेल्या कारवाई देहव्यापार सूर असल्याने एकाला ताब्यात घेतलं आहे.

तसेच या प्रकरणातील दोघे जण फरार झाले आहे. निर्भय बलबीर अस अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तसेच स्पा मालक रवी कटरे आणि सहकारी रवी साहू हे दोघेही फरार झाले आहे. याच सलूनमधून तीन तरुणींची सुटका करण्यात आली आहे.

स्पामध्ये नावावर देहव्यापार

अंबाझरी पोलिस ठाणे हद्दीतील टिळक नगर येथे 'ड्रीम' सलून फॅमिली स्पामध्ये नावावर देहव्यापार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावेळी एकाला ग्राहक म्हणून पाठवत पोलिसांनी खात्री केली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने आत जाऊन कारवाई केली. कारवाई दरम्यान पोलिसांना तीन पीडित तरुणी आढळल्या. पोलिसांनी त्यांची सुटका केली. या प्रकरणी मालक यश कटरे आणि सहकारी रवी शाहूंचा शोध सध्या सुरू आहे.

'देहव्यापार करणाऱ्यांना धडा शिकवा'

उपराजधानी नागपूरात सध्या सलून आणि स्पाचा नावावर मोठ्या प्रमाणात देहव्यापाराच्या घटना उघडकीस येत आहे. सातत्याने आर्थिक परिस्थितीचा फायदा घेत तरुणींना पैशांचं आमिष देऊन यात ढकलले जात आहे. त्यांना या व्यवसायात ढकलून त्यांचाकडून स्पाचा नावावर हे भलताच व्यवसाय सुरू आहे. त्यामुळे अशा स्पा आणि सलूनच्या आड सुरू असलेल्या देहव्यापार करणाऱ्यांना धडा शिकवण्याची गरज आहे, असा सूर नागरिकांमधून उमटत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT