Rajsthan News  Saam Tv
क्राईम

Rajsthan News : भयंकर! पतीकडून पत्नीला अमानुष मारहाण, दुचाकीला बांधून दूर फरफटत नेलं; संतापजनक घटनेचा VIDEO व्हायरल

Rajsthan Shocking News : राजस्थान जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजस्थानमधील नागौरमधून एक हृदयद्रावक घटना घटना समोर आली आहे. जिथे एका पतीने आपल्याच पत्नीला दुचाकीला बांधून ओढले. पतीने नकार देऊनही पत्नी बहिणीच्या घरी गेल्याने पतीने हे कृत्य केल्याचे मीडिया रिपोर्टनुसार समजते. सध्या सर्वत्र हा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला असून या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करुन आरोपी पतीला अटक करण्यात आलेली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, हे संपूर्ण धक्कादायक(Shocking) प्रकरण नागौरच्या पंचोरी पोलीस स्टेशन हद्दीतील पंचौरी गावातील आहे. आरोपी पतीचे प्रेमराम असे नाव असून तोही पंचौरी येथील स्थानिक रहिवासी आहे. प्रेमराम त्याच्या पत्नीला मोटरसायकलच्या मागे बांधून ओढत असल्याचे दिसते. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीनला अटक केलीय.

प्रेमराम आणि त्याच्या पत्नीचे साधारण १० महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. प्रेमराम हा सासत्याने मद्यपान करत असल्याचे समोर आले असून तो दररोज पत्नीला मारहाण करत असत. या संतापजनक घटनेबाबतची माहिती देताना नागौरचे पोलीस अधीक्षक म्हणतात, व्हायरल(Video) होत असलेल्या व्हिडिओच्या आधारे आरोपीविरुद्धात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आलेली आहे.

नेमक कारण काय?

पीडित पत्नीने साधारण महिन्यापूर्वी बारमेर येथे राहणाऱ्या बहिणीच्या घरी जाण्याचा हट्ट धरला होत. मात्र पतीच्या नकारानंतरही पत्नी(Wife) गेली.ज्यामुळे पती इतका संतापला की त्याने आपल्या पत्नीला मोटरसायकलच्या मागे बांधून ओढून नेण्यास सुरुवात केली. धक्कादायक म्हणजे परिसरातील व्यक्तींनी पतीला थांबवण्याचे धाडसही केले नाही.उलट त्यांनी या प्रकाराचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. शिवाय हा व्हिडिओ गेल्या महिन्यापूर्वीचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Sa: चौथ्या सामन्यात बुमराह करणार कमबॅक? पाहा सिरीज जिंकण्यासाठी कशी असेल भारताची प्लेईंग 11

Maharashtra Live News Update: लातूरमध्ये काँग्रेसला उतरती कळा, माजी महापौर, माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

Madhuri Dixit Photos : "परी हो या हो परियों की रानी..."; गुलाबी ड्रेसमध्ये 'धक धक गर्ल'चं आरस्पानी सौंदर्य

शरद पवरांच्या खासदाराने घेतली अमित शाहांची भेट, नेमकं कारण काय?

AAI Recruitment: एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी अन् १.१० लाख रुपये पगार; या पदांसाठी भरती सुरु; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT