Mumbra firing case two accused arrested Saam Tv
क्राईम

Crime News: मुंब्रा फायरिंग प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; एका तासात आरोपी जेरबंद

Crime News: मुंब्रा येथे पहाटे झालेल्या फायरिंग प्रकरणात पोलिसांनी पाठलाग करून दोन आरोपींना अटक केली. गोळीबारात दोन जण जखमी झाले असून आरोपींकडून पिस्टल, काडतुसे आणि मॅगझिन जप्त करण्यात आली.

Shruti Vilas Kadam

Crime News: ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील मुंब्रा येथे शनिवारी (७ मार्च) पहाटे फायरिंगची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत दोन जण जखमी झाले असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या एका तासात दोन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मुंब्रा पोलीस आणि गुन्हे शाखेकडून समांतरपणे सुरू आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे सुमारे ४.५४ वाजण्याच्या सुमारास अरमान को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी, अल्मास कॉलनी, कौसा परिसरात गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही घटना नदीम मोइनुद्दीन खान उर्फ बाबा खान (वय ४५) यांच्या घराबाहेर घडली. अज्ञात व्यक्तीने त्यांच्या MH 03 CN 5900 क्रमांकाच्या कारवर दोन गोळ्या झाडल्या, तर एक गोळी हवेत फायर केल्याचे समोर आले आहे.

घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिसरात शोधमोहीम सुरू केली. दरम्यान आरोपी परिसरातील आचार गल्ली येथील भंगार गोदामाजवळ लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस पथक तेथे पोहोचताच आरोपीने दोन पिस्टलमधून पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्यानंतर तो पळत सुटला आणि पळताना पुन्हा त्याने फायरिंग केली.

पोलिसांनी तत्काळ आरोपीचा पाठलाग केला. आरोपीला पकडण्याचा प्रयत्न सुरू असताना त्याने मागे वळून केलेल्या गोळीबारात दोन जण जखमी झाले. जखमींना तातडीने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान पोलिसांना पाठलाग करत मुख्य आरोपीला अखेर पकडण्यात यश मिळवले. आरोपीच्या ताब्यातून दोन पिस्टल, चार काडतुसे आणि चार मॅगझिन जप्त करण्यात आले आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शहाबाद उर्फ शब्बू मुन्ना शमशाद कुरेशी (वय २८) असे असून तो मुंब्रा येथील रहिवासी आहे. त्याच्यावर जाफराबाद परिसरातील चार पोलीस ठाण्यांमध्ये विविध गुन्हे दाखल आहेत. तसेच तो यापूर्वी तिहार तुरुंगात आठ वर्षांची शिक्षा भोगून आला आहे. या घटनेतील आणखी एका संशयित साथीदारालाही पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढेल हे 1 फळ, रोज न चुकता खा

SCROLL FOR NEXT