Mumbai Crime : पोलिसांच्या घरांवरच चोरट्यांचा डल्ला! आयुक्त कार्यालयाजवळ सिलेंडर चोरी meta ai
क्राईम

Mumbai Crime : पोलिसांच्या घरांवरच चोरट्यांचा डल्ला! आयुक्त कार्यालयाजवळ सिलेंडर चोरी

Azad Maidan : मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय आणि एलटी मार्ग पोलीस ठाण्याच्या जवळच ही चोरीची घटना घडली आहे. 5 पोलिस कर्मचाऱ्यांच्या घरातून एकूण पाच गॅस सिलेंडर चोरीला गेले असून आझाद मैदान पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Saam Tv

संजय गडदे

  • ५ पोलिस कर्मचाऱ्यांच्या घरांना लक्ष्य

  • एलटी मार्ग परिसरात ५ गॅस सिलेंडर चोरी;

  • ११,५०० रुपयांचे नुकसान,

  • आझाद मैदान पोलिसांकडून तपास सुरू

मुंबईतील अतिसुरक्षित मानल्या जाणाऱ्या एलटी मार्ग परिसरात गॅस सिलेंडर चोरी करणाऱ्या टोळीने धुमाकूळ घातल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय आणि एलटी मार्ग पोलीस ठाण्याच्या अगदी जवळ असलेल्या निवासी परिसरातील पाच पोलिस कर्मचाऱ्यांच्या घरांना चोरट्यांनी लक्ष्य केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.या प्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एलटी मार्ग परिसरातील रूम क्रमांक ४ मध्ये राहणाऱ्या महिलेने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यांचे पती २००६ पासून मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत परिसरातील रहिवासी गॅस सिलेंडर ठेवत होते. ११ ऑगस्टच्या रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास तक्रारदार महिलेने आपला रिकामा सिलेंडर त्या ठिकाणी ठेवलेला पाहिला होता. मात्र, सकाळी सुमारे ६ वाजता पाहणी केली असता सिलेंडर गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

आजूबाजूला चौकशी केली असता चोरट्यांनी केवळ त्यांचाच सिलेंडर चोरला नसून शेजारी राहणाऱ्या अन्य पोलिस कर्मचाऱ्यांच्या घरांनाही लक्ष्य केल्याचे समोर आले. एकूण पाच सिलेंडर चोरीला गेले आहेत. यामध्ये चार एचपी कंपनीचे आणि एका भारत गॅस कंपनीच्या सिलेंडरचा समावेश आहे. चोरी झालेल्या सिलेंडरची एकूण किंमत सुमारे ११,५०० रुपये आहे.

मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या अगदी जवळ आणि अतिसुरक्षित परिसरात ही चोरी झाल्याने पोलिसांच्या सुरक्षाव्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, चोरट्यांचा माग काढण्यासाठी तपास सुरू आहे.

Ulhasnagar Firing: उल्हासनगर हादरलं! भरदिवसा रेल्वे स्टेशन परिसरात गोळीबार, एकाचा मृत्यू

Thursday Horoscope: पडणार पैशांचा पाऊस! 4 राशींच्या व्यक्तींची होणार चांदीच चांदी, वाचा राशीभविष्य

73 लाख किलो, 295 कंटेनर, 30 कोटी किंमत; पाकिस्तानातून भारतात आणलेल्या खडेमिठाचा असा झाला पर्दाफाश

मोठी बातमी! समाजवादी पक्षाच्या 6 नगरसेवकांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी, नेमकं कारण काय?

Fact Check: दारूच्या एका बाटलीवर दुसरी बाटली फ्री? दारूच्या फ्री बॉटलसाठी दुकानांबाहेर रांगा

SCROLL FOR NEXT