Mumbai News Saam Digital
क्राईम

Mumbai News : खजुराच्या निर्यातदाराला लावला ४. ३६ कोटींचा चुना; इराणमधील व्यापाऱ्याची मुंबईत तक्रार

Mumbai Crime News : एपीएममसी मार्केटमधील व्यापाऱ्याकडून इराणमधील खजुराच्या व्यापाऱ्यांकडून तब्बल २३ कंटेनर खजुर आयात करून बिलाची रक्कम न देता इराण मधील व्यापाऱ्याची तब्बल ४ कोटी ३६ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचं उघडकीस आलं आहे.

Sandeep Gawade

Mumbai News

एपीएममसी मार्केटमधील व्यापाऱ्याकडून इराणमधील खजुराच्या व्यापाऱ्यांकडून तब्बल २३ कंटेनर खजुर आयात करून बिलाची रक्कम न देता इराण मधील व्यापाऱ्याची तब्बल ४ कोटी ३६ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचं उघडकीस आलं आहे. नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या फसवणूक प्रकरणात सहभागी असलेल्या एपीएमसी मार्केटमधील फरीद तेली (६०), सादर तेली (३०), विरल शैलेशभाई तन्ना (३०), सुनिलकुमार (३०), देवकुमार ठक्कर उर्फ डी.के. (६०) या सहा व्यापाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार नबाब रुहुलाह अममिरजादे (४२) इराणमधील खजुराचे मोठे निर्यातदार आहेत. मार्च २०१८ मध्ये ते पत्नीसह भारतात व्यापारासाठी आले असताना, त्यांनी एपीएमसी मार्केट मधील खजुराचे व्यापारी देवकुमार ठक्कर उर्फ डी.के. यांची भेट घेतली होती. त्यानंतर जुन २०१९ मध्ये ठक्कर यांनी एपीएमसी मार्केटमधील तेली ट्रेडर्स या खजुरचे दुसरे व्यापारी फरीद तेली व त्यांचा मुलगा सादर तेली यांच्यासह इराणमध्ये नबाब यांच्या फॅक्टरीमध्ये जाऊन भेट घेतली होती. तसेच त्यांच्या सोबत खजुराचा व्यापर करणाची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी तेली पिता पुत्रांनी विविध प्रकारच्या खजुराच्या मालाचे एकूण २७ कंटेनेरची ऑर्डर दिली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नबाब यांनी सफ्टेबंर ते डिसेंबर २०१९ मध्ये फरीद तेली यांना न्हावाशेवा बंदरात २७ कंटेनर खजुराचा माल पाठवून दिला होता. त्यावेळी तेली पिता पुत्रांनी सदर मालाची रक्कम नबाब यांना पाठवून दिली होती. त्यानंतर तेली पिता पुत्रांनी जानेवारी २०२० मध्ये रमजान महिन्यांच्या अनुषंगाने नबाब यांच्याकडून आणखी २३ कंटेनर खजुर आयात केले होते. त्यानुसार नबाब यांनी त्यांच्या अलिया अर्ग अरबियन कंपनीच्या माध्यमातून इराण येथील बंदरातून भारतात न्हावाशेवा बांदरात गॅलेक्सी एक्सपोर्टस कंपनीच्या नावे १८ कंटेनर व वरायटी इम्पेक्स या कंपनीच्या नावाने ५ कंटेनर असा एकूण २३ कंटेनर खजुराचा माल पाठवून दिला होता. नबाब यांनी तेली पिता पुत्रांना २३ कंटेनर मालाचे पेमेंट करण्यासाठी सांगितले होते.

त्यामुळे नबाब यांनी मुंबईतील इराण येथील कॉन्स्युलेटमधील अधिकाऱ्याकडे मदतीसाठी धाव घेतली. त्यावेळी कॉन्स्युलेटमधील अधिकाऱयांनी तेली पिता पुत्र व नबाब यांची मिटींग घडवून आणली. तसेच फरीद तेली यांना २ लाख युएस डॉलरचे डिस्काऊंट देण्यास नबाब यांना सांगितले. त्यानंतर त्यांच्यात मालाचे पैसे देण्याबाबत ठराव देखील करण्यात आला. मात्र त्यानंतर देखील तेली पिता पुत्रांनी नबाब यांना मालाचे ४ कोटी ३६ लाख ६५ हजार रुपये दिले नाहीत.

या प्रकरणातील आरोपी व्यापाऱयांनी नबाब यांनी इराण देशातून पाठविलेला खजुराचा माल हा नबाब यांच्या कंपनीनी ऐवजी दुबई येथील अल कबिरा जनरल ट्रेडींग एलएलसी या कंपनीकडुन भारतात आल्याचे भासवण्यासाठी भारतातील कस्टम विभागाकडे अल कबिरा जनरल ट्रेडींग एलएलसी कंपनीच्या नावाची कागदपत्रे सादर केली होती. तसेच अल कबिरा जनरल ट्रेडींग एलएलसी कंपनीला या खजुराच्या मालाचे पैसे पाठवून दिल्याचे दाखविण्यात आल्याचे आढळुन आले आहे. त्यानंतर नबाब यांनी नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bollywood Actress : बॉलिवूड अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Homemade Hair Serum: केसांच्या वाढीसाठी घरीच बनवा खास 'होममेड सीरम', महागड्या प्रोडक्टला करेल फेल

Maharashtra News Live Update: अंजनगाव येथील विनपरवाना पुतळा बसवल्याप्रकरणी पोलिसांकडून तिसरी अटक

अवघ्या 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा तडाखा; जगातील सगळ्यात टॉप गोलंदाजाला चांगलाच धुतला, व्हिडिओ तुफान व्हायरल

Private School Corruption: शिक्षण सोडून शाळा बनताहेत 'दलालीचं केंद्र', शिक्षण माफिया कशी करतात पालकांची लूट?

SCROLL FOR NEXT