Mumbai Crime Saam Tv
क्राईम

Mumbai Crime News: क्लिनीकमध्ये आढळला अल्पवयीन मुलीचा मृतदेह; धक्कादायक घटनेनं मालाड हादरलं

Crime in Hospital Malad: काही दिवसांपूर्वी डॉक्टरांकडून तिला अपमानास्पद वागणूक मिळत असल्याची माहिती तिने मला दिली होती. त्यामुळे माझ्या मुलीने आत्महत्या केलेली नाही असा दावा तिच्या आईने केला आहे.

Ruchika Jadhav

Crime News:

मुंबईच्या मालाडमधील एका दातांच्या दवाखाण्यात धक्कादायक घटना घडली आहे. या क्लिनीकमध्ये एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडलाय. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीये. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. तसेच याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अल्पवयीन मुलीचा मृतदेह क्लिनीकमध्ये लटकलेल्या अवस्थेत होता. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. डॉक्टरांकडून मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे.

माझी मुलगी आत्महत्या करणारी नव्हती. तिला असं करण्यासाठी भाग पाडण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी डॉक्टरांकडून तिला अपमानास्पद वागणूक मिळत असल्याची माहिती तिने मला दिली होती. त्यामुळे माझ्या मुलीने आत्महत्या केलेली नाही असा दावा तिच्या आईने केला आहे.

आईने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी डॉक्टरांविरुद्ध आयपीसी कलम ३०६ (आत्महत्येला प्रवृत्त करणे), ३७६ (बलात्कारासाठी शिक्षा) आणि बाल न्याय कायदा आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा (POCSO कायदा) मधील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील तपास सुरू आहे.

आई- वडिलांसह बहिणीची निर्घृण हत्या

काही दिवसांपूर्वी राजस्थानच्या नागौरमध्ये एक विचित्र तिहेरी हत्याकांडाची घटना समोर आली होती. पडुलकान येथे राहणाऱ्या एका २० वर्षीय तरुणाने धारदार शस्त्राने वार करत आई - वडील आणि बहिणीची हत्या केली होती. इतकेच नव्हेतर हत्येनंतर तरुणाने स्वतः पडुकलन पोलीस ठाण्यात जाऊन संपूर्ण घटनेची माहिती दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zakir Khan : प्रसिद्ध कॉमेडियनची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील 'त्या' VIDEO मुळे चाहते चिंतेत

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्र्यांचा 'डॉक्टर ऑफ सायन्स' पदवी देवून होणार सन्मान

Crime: बायकोचं अनैतिक संबंध असल्याचा नवऱ्याला संशय, भेटायला बोलावून तरुणाला जागीच संपवलं; ठाणे हादरले

Accident News : देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला, यात्रेकरूंची बस दरीत कोसळून भीषण अपघात; ७ जणांचा मृत्यू

Fish Fry Masala Recipe: मासे तळायचा मसाला घरी कसा बनवायचा

SCROLL FOR NEXT