Kandivali News Google
क्राईम

Kandivali News: डोशाची ऑर्डर दुसऱ्या महिलेला आधी मिळाली, ग्राहकाचा पारा चढला; रागाच्या भरात नको ते करून बसला, गुन्हा दाखल

Kandivali Crime News:मुंबईतील कांदिवली परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. डोसा विक्रत्याने आपल्या आधी महिलेला पार्सल दिल्याने एका व्यक्तीला प्रचंड राग आला. त्याने त्याला महिलेशी गैरवर्तन आणि शिवीगाळ केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबईतील कांदिवली परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. डोसा विक्रत्याने आपल्या आधी महिलेला पार्सल दिल्याने एका व्यक्तीला प्रचंड राग आला. त्याने त्याला महिलेशी गैरवर्तन आणि शिवीगाळ केली. याच आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. कांदिवली पूर्व परिसरात मंगळवारी ही घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि त्याच्या मित्रावर पोक्सो कायदा आणि आयपीसी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आली आहे. या दोघांना बुधवारी अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली येथील सेंट्रियम मॉलजवळील एका डोसा स्टॉलवर ही घटना घडली आहे. ३६ वर्षीय महिला आपल्या मुलीसह या स्टॉलवर डोसा खायला गेली होती. तिथे अनेक ग्राहक डोसा खात होतो. महिलेने डोसाची पार्सल ऑर्डर दिले. त्यानंतर डोसा विक्रेत्याने पार्सल दिले. परंतु तिथे असलेल्या एका व्यक्तीने महिलेआधी ऑर्डर दिली होती. परंतु आपल्याला ऑर्डर न देता महिलेला आधी ऑर्डर दिली याचा त्या व्यक्तीला प्रचंड राग आला.

रागाच्या भरात त्याने महिलेला शिवीगाळ केली. त्या व्यक्तीने डोसा विक्रेत्याला पण जाब विचारला. तू जाणून बूजून माझ्याआधी महिलेला डोसा दिला काय? असं त्याने विचारलं. यानंतर महिलेनेदेखील त्याला उत्तर दिले. त्यांच्यात थोडा वाद झाला. त्यानंतर त्या व्यक्तीने महिलेला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली, असे पोलिसांनी सांगितले.

या संपूर्ण घटनेची माहिती महिलेने घरच्यांनी दिली. त्यानंतर महिलेचा दीर घटनास्थळी पोहोचला. त्यानंतर आरोपी आणि त्याच्या मित्राने महिलेच्या दीराला बेदम मारहाण केली, शिवीगाळ केली, असंही पोलिसांनी सांगितले. आजूबाजूचे लोक घटनास्थळी दाखल व्हायला लागल्यावर आरोपी आणि त्याचे मित्र पसार झाले. या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट, पगारासोबत HRA, भत्ते आणि पेन्शनमध्येही होऊ शकतात मोठे बदल

Costal Road: कोस्टल रोडच्या बोगद्यात धावत्या कारने घेतला पेट, परिसरात धुरांचे लोट; दोन्ही मार्गिका बंद केल्याने वाहतूक कोंडी| VIDEO

Panvel : पनवेलमध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस, १० जणांवर हल्ला; ६४ वर्षीय व्यक्तीच्या डोळ्याचा घेतला चावा

Pav Bhaji Recipe : मुंबई स्टाईल पावभाजी घरच्या घरी कशी बनवायची? सीक्रेट रेसिपी आताच लिहून घ्या

Maharashtra News Live Update: मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवड घाटात वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT