Mumbai Crime News Saam Digital
क्राईम

Mumbai Crime News: पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तरुणाची हत्या, मृतदेह मिठी नदीत फेकला

Mumbai Crime News: पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून 23 वर्षांच्या तरुणाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईच्या गोवंडी परिसरात घडला आहे. आरोपींनी अमान अब्दुल करीम शेख याची हत्या करून मृतदेह कुर्ला परिसरातील मिठी नदीत फेकून दिला होता.

Sandeep Gawade

Mumbai Crime News

पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून 23 वर्षांच्या तरुणाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईच्या गोवंडी परिसरात घडला आहे. आरोपींनी अमान अब्दुल करीम शेख याची हत्या करून मृतदेह कुर्ला परिसरातील मिठी नदीत फेकून दिला होता. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नफीस खान(३६), मुकेश पाल (२५) आणि मोहम्मद साकीर सेद (२३) यांना अटक केली असून पुढील तपास सरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ जानेवारीला पोलिसांना मिठी नदीत मृतदेह सापडला होता. या मृतदेहाबाबत पोलिसांनी आसपासच्या परिसरात हरवलेल्या व्यक्तींची चौकशी केली असता अमानच्या नावे मिसिंग तक्रार झाल्याचं समोर झालं. त्यानंतर मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपासीची चक्रे फिरवत कक्ष ५ ने तांत्रिक मदतीच्या आधारे तिघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

'साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या आरोपींकडून गुन्हे शाखेने दोन बंदुका, धारदार हत्यारे आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरण्यात आलेली रिक्षा देखील जप्त केली आहे. नफीस खान, मुकेश पाल आणि मोहम्मद साकीर सेद या तिघांनीही पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून अमानची हत्या केल्याची कबूली दिली आहे.

पालघरमध्ये दरोडेखोरांच्या टोळीला अटक

मुंबईतील बँक ऑफ बडोदावर २०१७ मध्ये भुयारी मार्गे धाडसी दरोड्या टाकणाऱ्या दरोडेखोरांच्या सराईत टोळीला जेरबंद करण्यात पालघर पोलिसांना यश आलं आहे. रात्रीच्या सुमारास संशयास्पद गाडीचे नंबर प्लेट बदलताना पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता हे तिघही सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलं. यामध्ये मुख्य आरोपीवर आतापर्यंत गंभीर स्वरूपाचे तब्बल 44 गुन्हे दाखल असून घरफोडी करताना या दरोडेखोरांकडून सशस्त्र दरोडा टाकला जायचा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Wari : लंडनमध्ये हरिनामाचा जयघोष; २२ देशातून १८ हजार किलोमीटरचा प्रवास, पंढरीची वारी पोहोचली लंडनला

Moong Dal Paratha Recipe : पावसाळ्यात खा गरमा गरम अन् मऊ लुसलुशीत मूग डाळ पराठा

Accident News : सून घरी येण्याचा आईला आनंद, नजर उतरवून लेकराला पाठवलं; भीषण अपघातात नवरदेवासह ८ जणांचा अंत

Maharashtra Live News Update: 22 देशातून 18 हजार किलोमीटरचा प्रवास 70 दिवसात करत पंढरीची वारी पोहोचली लंडनला

Kasara waterfall: मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहेत हे सुंदर धबधबे; One Day पिकनीक नक्की करा

SCROLL FOR NEXT