Mumbai customs seizes cocaine Saam Tv
क्राईम

Mumbai News : मुंबई विमानतळावर ४ कोटी रूपयांचं कोकेन जप्त; कस्टम विभागाची मोठी कारवाई

Mumbai customs seizes narcotics worth rupees four crore from Kenyan nationals : मुंबई विमानतळावरून चार कोटी रूपयांचं कोकेन जप्त करण्यात आलंय. याप्रकरणी कस्टम विभागाने एका परदेशी नागरिकाला अटक केल्याची माहिती मिळतेय.

Rohini Gudaghe

सचिन गाड, साम टीव्ही मुंबई

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ४.८३ कोटी रुपयांचं कोकेन जप्त करण्यात आलंय. कस्टम्स विभागाने ही कारवाई केलीय. केनियन नागरिकाकडून तब्बल ४८२.६६ ग्रॅम कोकेन जप्त केले आहेत. याप्रकरणी अदिस अबाबावरून आलेल्या प्रवाशाला अटक करण्यात (Mumbai customs) आलीय. गुदद्वारात लपवून अमली पदार्थाची तस्करी सुरू होती. अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत केनियन नागरिकाला अटक करण्यात आल्याची माहिती मिळतेय.

परदेशी नागरिकाला अटक

मुंबई कस्टम्सने १५ -१६ ऑगस्ट रोजी रात्री मुंबई विमानतळावर मोठ्या कारवाईत ४८२.६६ ग्रॅम कोकेन जप्त केले. या कोकेनची बाजारातील किंमत ४ कोटींहून अधिक असल्याचा अंदाज आहे. केनियन नागरिकाच्या गुदद्वारात हा अमली पदार्थ सापडला (Mumbai internation airport) होता. या घटनेमुळे मुंबई विमानतळावर मोठी खळबळ उडाली होती.

मुंबई विमानतळावरून अमली पदार्थ जप्त

या प्रवाशाची केनियातील काकामेगा येथील रहिवासी असल्याची ओळख पटली आहे. मुंबई कस्टम्सने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, केनियन नागरिक आदिस अबाबा येथून इथियोपियन एअरलाइन्सच्याफ्लाइटने मुंबईत आले होते. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत मुंबई सीमा शुल्क आयुक्तालयाने एका केनियन नागरिकाला अमली पदार्थांसह अटक केलीय. कस्टम अधिकाऱ्यांनी पांढरी पावडर असलेली सात कॅप्सूल जप्त केली होती. नंतर त्या कॅप्सुलमध्ये कोकेन (cocaine) असल्याची पुष्टी झाली.

कस्टम विभागाची मोठी कारवाई

जप्त केलेल्या पदार्थाचे (Narcotics) एकूण वजन अंदाजे ४८२.६६ ग्रॅम होते. याची अंदाजे बाजार मूल्य रूपये ४, ८२, ६०,००० इतके आहे. केनियन नागरिकाला अटक करण्यात आलीय. तस्करीच्या कारवाईत सहभागी असलेल्या इतरांची ओळख उघड करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. या तस्करीमध्ये आणखी कोणाचा समावेश आहे, याची चौकशी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Police : भिवंडीत गांजा विक्री करणारे तिघे ताब्यात; ३७ लाखाचा गांजा जप्त

Kalyan News: कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा! पलावा पुल आजपासून नागरिकांसाठी सुरू|VIDEO

Sanjay Raut : हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर संजय राऊतांची तिखट प्रतिकिया

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT