Youth Shoot Himself Saam Tv
क्राईम

Mumbai Crime: पोलीस हवालदाराच्या मुलाची आत्महत्या, वडिलांच्या सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून झाडल्या गोळ्या

Youth Shoot Himself : मुंबईत दोन आत्महत्येच्या घटना घडल्यानं शहरात खळबळ माजलीय. दोन्ही घटनेत दोन्ही तरुणांनी बंदुकीतून गोळ्या झाडून आत्महत्या केलीय. एका घटनेत पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाने जीवन संपवलं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन गाड, साम प्रतिनिधी

मुंबईत दोन आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. दोन्ही घटनांमध्ये तरुणांनी स्वता:वर गोळ्या झाडल्या आहेत. या घटनेमुळे शहरात खळबळ उडालीय. एका घटनेत पोलीस हवालदाराच्या मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. हर्ष म्हस्के, असे या मुलाचे नाव आहे. त्याने वडिलांच्याच सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून गोळ्या झाडून आत्महत्या केलीय. पोलीस हवालदाराचं नाव संतोष म्हस्के आहे. मुंबईतील एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडलीय. हर्ष म्हस्केने आत्महत्या का केली याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये.

भांडुप परिसरातही एका तरुणाने स्वता:वर गोळ्या झाडून आत्महत्या केलीय. आत्महत्या करणारा तरूण हा तणावग्रस्त होता त्यातून त्याने आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. साहिल कुरेशी 23 वर्षे असं तरुणाचं नाव आहे. आज पहाटे सकाळी सहा वाजता राहत्या घरी आत्महत्या केल्याची माहिती मिळतेय.

हर्षचे वडील पोलीस हवालदार संतोष म्हस्के हे SP युनिटमध्ये मुंबई पोलीस दलात हवालदार म्हणून कार्यरत आहेत. संतोष म्हस्के यांच्या सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून हर्षने स्वत:च्या डोक्यात गोळ्या झाडत आत्महत्या केली. संतोष म्हस्के हे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडे काही काळ बंदोबस्तासाठी होते. सध्या मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक हे त्यांच्या घरी पोहोचले आहे. ते या घटनेची माहिती घेत आहेत. मात्र २० वर्षीय हर्ष म्हस्केने आत्महत्या का केली, असा प्रश्न केला जातोय.

विद्यार्थिनीने शाळेच्या टॉयलेटमध्ये केली आत्महत्या

काही दिवसापूर्वी मुंबईत अशीच एक मनाला चटका लावणारी घटना घडली होती. मुंबईमध्ये विद्यार्थिनीने शाळेच्या टॉयलेटमध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. ही विद्यार्थिनी अकरावीमध्ये शिकत होती. गोरेगाव पूर्वच्या नामांकित शाळेमध्ये ही घटना घडलीय. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या विद्यार्थिनीने आत्महत्या का केली यामागचे कारण अद्याप समोर आले नाही. पोलिस सध्या तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

एकनाथ शिंदेंनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा एका फटक्यात संपतील - जरांगेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT