Mumbai Crime Gold Smuggling  Saam Tv
क्राईम

Mumbai Airport: डीजेच्या लाईटमधून सोन्याची तस्करी; 12 किलो सोनं जप्त, DRIची कारवाई

Mumbai Crime Gold Smuggling : मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर पुन्हा १२ किलो सोनं जप्त करण्यात आले आहे. या सोन्याची किंमत ९.६ कोटी असल्याचं सांगितलं जात आहे.

Bharat Jadhav

सचिन गाड, साम प्रतिनिधी

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पुन्हा एकदा सोने जप्त करण्यात आले आहे. डिजेच्या लाईटमधून सोन्याची तस्करी केली जात होती. महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने डिजेच्या लाईटमधून तब्बल १२ किलो वजनाचे सोनं जप्त केली आहे. याची किंमत ९.६ कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून विमानतळावर महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने मोठ्या प्रमाणात सोनं जप्त केलंय. मागील आठवड्यात ४८ किलो सोनं जप्त करण्यात आलंय. देशात सिंडिकेटद्वारे मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी झाल्याचा अंदाज डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना वर्तवलाय. दरम्यान आज करण्यात आलेल्या कारवाई बाबत अधिकाऱ्यांना गुप्त माहिती मिळाली होती.

डिजेच्या लाईटमधून सुद्धा सोन्याची तस्करी केली जाते अशी गृप्त माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी गोदाम शोधून तेथील डीजेचे लाईट तपासले. सोन्याच्या तस्करीसाठी वापरल्या जाणाऱ्या पोकळ्यांसह ६८ डीजे लाईट सापडले. यात एकून १२ किलो वजनाचे ९.६ कोटी रुपयाचे सोने डीआरआय विभागाने जप्त केलंय. सोन्याच्या तस्करी प्रकणात दोन जणांना अटक करण्यात आलीय.

गेल्या आठवड्यात डीआरआय मुंबईने सोन्याची तस्करी करणाऱ्या सिंडिकेटच्या विरोधात उल्लेखनीयक कामगिरी केलीय. डीआरआयने गेल्या आठवड्यात सुमारे ४८ किलो तस्करीचे सोने जप्त केली आहेत.

DRIच्या कारवाईत १० कोटी रुपयांचं सोनं जप्त

दोन दिवसापूर्वीही डीआरआयने सोन्याची तस्करी करणाऱ्यांना जबर धक्का दिला होता. तब्बल १० कोटी रुपयांचं सोनं जप्त करण्यात आले होते. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर फूड कोर्टात काम करणाऱ्या तीन कर्मचारीच सोने तस्करीत मदत करत असल्याची बाब याप्रकरणाने समोर आली होती. याप्रकरणी विमानतळावरील फूड कोर्टात काम करणाऱ्या तिघांसह ६ जणांना अटक करण्यात आलीय. कारवाईने सोन्याच्या तस्करीत गुंतलेल्या एका मोठ्या सिंडिकेटचा पर्दाफाश झाला.

विमानतळावरील कर्मचारी एका सिंडिकेटचा भाग होते. आंतरराष्ट्रीय वाहतूक प्रवाशांकडून सोने मिळवून ते विमानतळाबाहेर पोचवत असायचे. डीआरआयला ही माहिती मिळाल्यानंतर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावर पाळत ठेवली त्यानंतर कारवाई करत सहा जणांना अटक करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT