Mumbai Crime News saam tv
क्राईम

Mumbai Crime: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; भाजी विकणाऱ्याकडून १.५ कोटींचे अंमली पदार्थ जप्त, तपासात नेपाळ कनेक्शन उघड

Mumbai Crime News In Marathi: मुंबईत पोलिसांनी अंमली पदार्थ पुरवठा करणाऱ्या दोघांचा पर्दाफाश केला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या डीसीपी प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वात २ कोटींहून अधिक अंमली पदार्थ बाळगणाऱ्या दोघांना अटक केली आहे.

Vishal Gangurde

Mumbai Crime News:

मुंबईत पोलिसांनी अंमली पदार्थ पुरवठा करणाऱ्या दोघांचा पर्दाफाश केला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या डीसीपी प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वात २ कोटींहून अधिक अंमली पदार्थ बाळगणाऱ्या दोघांना अटक केली आहे. लक्ष्मण जयस्वाल आणि रोहित गुप्ता असे आरोपींचे नावे आहेत. 'आज तक'ने याबाबत वृ्त्त दिलं आहे. (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण जयस्वाल हा मुंबईत भाजी विकण्याचं काम करतो. तर गुप्ता देखील छोटे मोठे काम करतो. दोघेही एकमेकांना ओळखतात. ते दोघेही एकाच गावाचे आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांच्या माहितीनुसार, मुंबईच्या बोरीवली पश्चिम भागात अंमली पदार्थ पुरवठा केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी रात्री सापळा रचत दोघांना अटक केली आहे.

अन् गुप्ता चुकीच्या मार्गाला लागला

गुप्ताला पैशांची गरज होती. त्यामुळे जयस्वालने त्याला मुंबईत अंमली पदार्थ विकल्यास भरपूर पैसे मिळतील,असं सांगितलं. अंमली पदार्थ आणण्यासाठी तो नेपाळ बॉर्डरपर्यंत गेला होता. नेपाळमधूनच एकाने त्याला २ किलो अंमली पदार्थ दिले. बाजारात अंमली पदार्थाची किंमत १.५ कोटी रुपये आहे.

गुप्ता आणि जयस्वालने अंमली पदार्थ विकत घेण्यासाठी काही जणांकडून पैसे घेतले होते. दोघांनी नेपाळहून अंमली पदार्थ मुंबईला आणले होते. या अंमली पदार्थ विक्री प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhatrapati shivaji maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्मिळ चित्र पाहिलीत का? बघा जगभरातील वस्तूसंग्रहालयात जतन केलेली चित्र

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

Ajit pawar Death : रोहितची काळजी वाटते, सरकारने सुरक्षेची जबाबदारी घ्यावी; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Kalyan : कल्याणमध्ये दोन गटात तुफान हाणामारी, दोघे गंभीर जखमी; परिसरात तणावपूर्वक वातावरण

GK : मेट्रो चालवणाऱ्याचा महिन्याला किती पगार मिळतो? आकडा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT